गुगलने प्ले-स्टोअरमधून हटवले डेटा चोरणारे ३३१ ॲप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:08 IST2025-03-22T17:07:52+5:302025-03-22T17:08:11+5:30

युजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी करणारे ३३१ मोबाइल ॲप्स गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले आहेत.

Google removes 331 data-stealing apps from Play Store | गुगलने प्ले-स्टोअरमधून हटवले डेटा चोरणारे ३३१ ॲप्स

गुगलने प्ले-स्टोअरमधून हटवले डेटा चोरणारे ३३१ ॲप्स

कॅलिफोर्निया - युजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी करणारे ३३१ मोबाइल ॲप्स गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. हे ॲप्स आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी ‘व्हॅपर ऑपरेशन’ नामक मोहिमेअंतर्गत हे ॲप्स तयार केले होते. 

दररोज याद्वारे २०० दशलक्ष बनावट जाहिरात रिक्वेस्ट पाठविल्या जात असत. आयएएस थ्रेट लॅबने अशा १८० ॲप्सचा छडा लावला होता. नंतर बिटडिफेंडरने आणखी ॲप्स शोधून काढले. हा आकडा ३३१ वर नेला. हे ॲप्स  फिशिंग अटॅकच्या माध्यमातून युजर्सची लॉगिनविषयक पर्सनल माहिती चोरतात. क्रेडिट कार्डची माहिती यांच्या रडारवर असते. 

कशी होते डेटाचोरी?

ॲप्स सिस्टम सेटिंगमध्ये खऱ्या ॲप्ससारखंच नाव घेऊन लपतात. बॅकग्राउंडला चालू असतातात. युजर इनपुटशिवाय स्वत:ला लाँच करतात. जाहिरात दाखवून अँड्ऱॉईडचं बॅक बटन डीॲक्टिव्हेट करतात. लोकप्रिय वेबसाइटसाठी नकली लॉगिन पेज  दाखवून कार्ड डेटा व पासवर्ड चोरतात.
 

Web Title: Google removes 331 data-stealing apps from Play Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल