शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Google Pixel 6 Pro चा फोटो लीक; समोर आला दमदार ट्रिपल कॅमेरा सेटअप 

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 18:48 IST

Google Pixel 6 Pro leak photo: Google Pixel 6 Pro स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. या फोनचा एक फोटो लीक झाला आहे, यातून डिजाइन आणि कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.  

Google ऑगस्टमध्ये आपला Pixel 5A हा मिड रेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यांनतर ऑक्टोबरमध्ये कंपनीचे Pixel 6 आणि Pixel 6 Pro हे स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी एका लीक रिपोर्टमध्ये Pixel 6 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. आता Google Pixel 6 Pro स्मार्टफोनचा एक फोटो लीक झाला आहे. या लीक फोटोच्या माध्यमातून फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.  (Google pixel 6 Pro Live Photos Suggest Huge Rear Camera Sensors And Slim Bezels)

Google Pixel 6 Pro ची डिजाईन 

लीक फोटो नुसार, Google Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्लेमध्ये एका पंच होलसह खूप बारीक पातळ बेजल मिळतील. समोर आलेल्या फोटोमध्ये कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट दिसत नाही, त्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असण्याची शक्यता आहे.  Pixel 6 Pro च्या मागे ड्युअल टोन फिनिश आणि हॉरीझॉन्टल कॅमेरा स्ट्रीप देण्यात आली आहे. 

या स्ट्रीपमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एक LED फ्लॅश मिळू शकतो. कॅमेरा सेटअपमध्ये एक आयताकृती कॅमेरा दिसत आहे, हा कॅमेरा Periscope Zoom लेन्स असू शकते. फोनच्या खालच्या भागात GR1YH हा मॉडेल नंबर दिसला आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये या मॉडेल नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे. फोनच्या मध्यभागी गुगलची ब्रँडिंग दिसत आहे. 

Google Pixel 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्या पंच होल कटआउटमध्ये देण्यात येईल. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. त्याचबरोबर 48 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स देखील मिळेल. रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये गुगलने बनवलेला चिपसेट असेल. या चिपसेटला 12GB पर्यंतच्या रॅमची जोड देण्यात येईल. हा गुगल स्मार्टफोन अँड्रॉइड 12 सह बाजारात दाखल होऊ शकतो. यात 5000mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.  

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन