Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:14 IST2025-10-20T14:13:31+5:302025-10-20T14:14:33+5:30
Google Pixel 10: प्रीमियम फीचर्स आणि उत्तम कॅमेरा क्वॉलिटीसाठी ओळखला जाणारा हा फोन आता दिवाळी सेलमध्ये अगदी स्वस्तात उपलब्ध झाला आहे.

Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
स्मार्टफोन चाहत्यांसाठी दिवाळीचा सण एक मोठी संधी घेऊन आला आहे. नुकताच लाँच झालेल्या गुगल पिक्सेल १० च्या किमतीत पहिल्यांदाच मोठी कपात करण्यात आली असून, हा प्रीमियम फोन दिवाळी सेलमध्ये १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. अॅपलच्या आयफोन १७ ला टक्कर देणारा हा गुगल फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे.
गुगल पिक्सेल १० ची लॉन्चिंग किंमत ₹७९ हजार ९९९ होती. हा फोन एकाच स्टोरेज पर्यायात (१२ जीबी रॅम + २५६ जीबी) येतो. या फोनच्या खरेदीवर ११ हजार ८५९ रुपयांची सूट मिळत असून, हा फोन ६८ हजार १४० रुपयांत उपलब्ध झाला आहे. या फ्लॅट डिस्काउंटव्यतिरिक्त, ग्राहकांना फोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्सचा लाभ घेता येईल. एचडीएफसी बँक कार्डधारकांना अतिरिक्त सूट मिळण्याची शक्यता आहे. हा फोन इंडिगो, फ्रॉस्ट, लेमनग्रास आणि ऑब्सिडियन अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
गुगल पिक्सेल १०: डिस्प्ले
गुगल पिक्सेल १० मध्ये ६.३ इंचाचा 'अॅक्चुआ डिस्प्ले' देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ (Hz) रिफ्रेश रेट असलेला OLED पॅनल वापरण्यात आला आहे, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ मिळतो. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास २ ने संरक्षित आहे.
गुगल पिक्सेल १०: कॅमेरा आणि स्टोरेज
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा (४८+ १३+ १०.८) सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १०.५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन १२ GB रॅम आणि २५६ GB इंटरनल स्टोरेजच्या एकाच प्रकारात उपलब्ध आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून यात नवीनतम अँड्राईड १६ चा सपोर्ट मिळतो.
गुगल पिक्सेल १०: बॅटरी
फोनमध्ये ४,९७० mAh क्षमतेची बॅटरी असून, ती ३० वॅट (W) वायर्ड आणि १५ वॅट (W) वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम कार्डची सुविधा आहे, ज्यात एक फिजिकल सिम कार्ड आणि एक eSIM चा समावेश आहे. हा फोन IP६८ वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसह येतो.