शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

Hybrid Work Culture: आठवड्यातून ३ दिवसचं ऑफिसला जाणार Google चे कर्मचारी; पूर्ण 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:00 IST

Google Hybrid Work Culture : अनेक कंपन्यांकडून नव्या हायब्रिड कल्चरचा करण्यात येत आहे वापर.

ठळक मुद्देअनेक कंपन्यांकडून नव्या हायब्रिड कल्चरचा करण्यात येत आहे वापर.ऑफिस सुरू झाल्यानंतरही २० टक्के कर्मचारी काम सुरू ठेवणार.

Hybrid Work Culture: सध्या जगभरात कोरोनाच्या महासाथीनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे. अनेक कंपन्या नव्या हायब्रिड मॉडेलचा वापी करत आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना काही दिवस ऑफिसमध्ये तर काही दिवस वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google नंदेखील या मॉडेलचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Google आणि Alphabet चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच गुगलचे कर्मचारी आठवड्याचे तीन दिवस ऑफिसमधून आणि दोन दिवस आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाहून काम करू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरिस ऑफिस उघडल्यानंतरही कंपनीचे २० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवतील आणि काही कर्मचारी आठवड्याचे काही दिवस ऑफिसमधून काम सुरू ठेवतील. पूर्ण वेळ घरून काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ज करावा लागणार असल्याचंही पिचाई यांनी नमूद केलं आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला आठवड्यातील तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ऑफिसमध्ये राहावं लागू शकतं. तसंच प्रोडक्ट एरिया आणि फंक्शन्सच्या आधारावर याचा निर्णय घेतला जाईल की कोणती टीम कोणत्या दिवशी ऑफिसमध्ये राहिली. कर्मचाऱ्यांना कंपनी त्यांची भूमिका आणि टीमची गरज यानुसार आठवड्याचे पाच दिवस वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देईल. परंतु यासाठी अर्ज करावा लागणार आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर गुगलचे कर्मचारी वर्षातील चार आठवडे आपल्या मुख्य कार्यालयापासून अन्य ठिकाणाहूनही काम करू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. सध्या गुगलमध्ये एकूण १ लाख ३९ हजार ९९५ कर्मचारी कार्यरत आहेत. तर एका अंदाजानुसार भारतातही गुगलचे चार हजार कर्मचारी आहेत. भारतात गुगलची मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि गुरुग्राममध्ये कार्यालये आहेत. 

टॅग्स :googleगुगलcorona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत