शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भयंकर! Google Maps वापर करणं बेतलं जीवावर; मृत्यूला कारणीभूत ठरली "ती" एक चूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:56 AM

Google Maps : गुगल मॅपच्या चुकीमुळे तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करताना हमखास गुगल मॅप्सचा वापर केला जातो. गुगल मॅप्सच्या मदतीने अनेकदा रस्ता शोधणं अथवा पत्ता सापडणं सहज शक्य होतं. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत इच्छित स्थळी पोहचण्यास मदत होते. मात्र गुगल मॅपचा वापर करणं एक तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. गुगल मॅपच्या चुकीमुळे तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियाच्या सायबेरियामध्ये राहणाऱ्या तरुणाला गुगलने चुकीचा रस्ता दाखवला आणि यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. 

स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 18 वर्षीय तरूण आपल्या एका मित्रासोबत बाहेर गेला होता. त्याने गुगल मॅपची रस्ता शोधण्यासाठी मदत घेतली. त्यावळी गुगलने त्याला चुकीचा रस्ता दाखवला. त्यामुळे तो चुकीच्या ठिकाणी पोहोचला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. सर्गे उस्तीनोव आणि वाल्दील्साव इस्तोमिन हे दोघे सायबेरियातील पोर्ट ऑफ मॅगेडन या भागात जात होते. हा भाग थंड प्रदेश आहे. त्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. 

गुगल मॅपच्या एका चुकीमुळे हे दोघेही चुकून रोड ऑफ बोन्स या ठिकाणी पोहचले. हा भाग रात्रीच्या वेळेस हवामानामुळे धोकादायक समजला जातो. या ठिकाणी रात्री तापमानात मोठी घट होते. गुगल मॅपने शॉर्टकट दाखवण्याच्या प्रयत्नात दोघांना या धोकादायक मार्गावर पाठवले. हा मार्ग अवघडही आणि धोकादायक होता. हा रस्ता पूर्णपणे बर्फाच्छादीत होता. तापमानात मोठी घट झाल्यामुळे कारच्या रेडियेटरनेदेखील काम करणे बंद केले. यामध्ये थंडीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

तरुणांना येथील वातावरणाबद्दल माहिती नव्हती. तसेच दुसऱ्या तरुणाची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे. ज्या मार्गावर सर्गे याचा मृत्यू झाला, त्या मार्गाला 'मृत्यूचा मार्ग' म्हटलं जातं. या रस्त्याच्या निर्मिती सोव्हिएत युनियनच्या काळात स्टॅलिनने केली होती. या रस्त्याच्या बांधणीसाठी कैद्यांचा वापर केला असल्याचे म्हटले जाते. रस्तेबांधणीच्या वेळीही अनेकांचा मृत्यू झाला होता. 1970 नंतर या रस्त्याचा वापर करणे बंद केला असल्याचं म्हटलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :googleगुगलrussiaरशियाDeathमृत्यू