Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:02 IST2025-09-16T19:01:45+5:302025-09-16T19:02:42+5:30

Google Gemini Saree Trend : एका इन्स्टाग्राम युजरने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता वाटू लागली आहे.

google gemini saree trend gone wrong for instagram user whose hidden mole visible in ai image | Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव

Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव

गुगल जेमिनीचा ट्रेंड आता सर्वच जण फॉलो करत आहेत. हे टूल थ्रीडी मॉडेल इमेजेसपासून रेट्रो साड्यांपर्यंत फोटो बनवत आहेत. पण आता प्रश्न असा निर्माण होत आहे की नॅनो बनाना टूल किती सुरक्षित आहे? गुगलनं त्यांचं एआय टूल सुरक्षित आहे, ज्यावर फक्त युजर्स त्यांचे फोटो शेअर करू शकतात असं म्हटलं आहे. याच दरम्यान आता एका इन्स्टाग्राम युजरने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता वाटू लागली आहे.

झलक भवनानी नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की, गुगल जेमिनीच्या नॅनो बनानाने तिचा फोटोमध्ये दिसत नसलेला तीळ देखील साडीच्या फोटोमध्ये दाखवला आहे. ही हैराण करणारी गोष्ट आहे. याचा तरुणीला देखील धक्का बसला. तिने आपल्या प्रायव्हसीबद्दल देखील व्हिडीओमध्ये चिंता व्यक्त केली. जेमिनीच्या नॅनो बनाना टूलने हे कसं केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


इन्स्टाग्राम युजरने व्हिडिओमध्ये सांगितलं की, तिने जेमिनी ट्रेंड फॉलो करून नॅनो बनाना फीचरचा वापर केला. यासाठी तिने एक फोटो अपलोड केला ज्यामध्ये तिने फूल स्लीव्सचा एक ड्रेस घातला होता. त्यानंतर तिने रेट्रो साडीचा प्रॉम्प्ट दिला, जेणेकरून साडीतील तिचा सुंदर फोटो तयार होईल. असंच घडलं, जेमिनीने काळ्या साडीतील फोटो दिला, त्यात ती फारच सुंदर दिसत होती.

परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'

झलकने आनंदाने तिचा हा फोटो सोशल मीडिया अकाउंटवर देखील पोस्ट केला, परंतु नंतर थोड्यावेळाने तिने काळजीपूर्वक आपला फोटो पुन्हा एकदा पाहिला. तेव्हा तिला जेमिनीने दिलेल्या फोटोमध्ये देखील हातावर तीळ असलेला दिसला. खरं तर प्रॉम्प्टसह तिने अपलोड केलेल्या फोटोत तिच्या हातावरचा तीळ अजिबात दिसत नाही. त्यामुळेच आता "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?" असा प्रश्न तरुणीला पडला आहे.  

हजारो युजर्सनी झलकच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. आणखी एका युजरने देखील कमेंटमध्ये तिच्यासोबत अशीच घटना घडल्याचं म्हटलं आहे. यावर एका युजरने इतरांना थेअरी समजावून सांगितली. "जेमिनी हे गुगलचं प्रोडक्ट आहे. गुगलला तुमच्या गुगल अकाउंटचा एक्सेस आहे, ज्यावर तुमचा फोटो देखील असणं आवश्यक आहे. या आधारावर जेमिनीने हा फोटो बनवला" असं म्हटलं.  मात्र ही घटना समोर आल्यानंतर युजर त्यांचे पर्सनल फोटो आणि माहितीबद्दल चिंतेत आहेत.
 

Web Title: google gemini saree trend gone wrong for instagram user whose hidden mole visible in ai image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.