Google Bard देणार ChatGPT ला जोरदार टक्कर; फुकटात तयार करून मिळणार AI फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:04 PM2024-02-02T16:04:53+5:302024-02-02T16:06:43+5:30

ChatGPT आणि Google Bard या दोन फिचरमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतेय

google bard can generate ai image for free as chatgpt plus rival | Google Bard देणार ChatGPT ला जोरदार टक्कर; फुकटात तयार करून मिळणार AI फोटो

Google Bard देणार ChatGPT ला जोरदार टक्कर; फुकटात तयार करून मिळणार AI फोटो

Google Bard vs ChatGPT, AI Image: सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे युग आहेत. त्यातच आता तुम्ही गुगल बार्डच्या मदतीने AI फोटो तयार करता येणार आहे. बार्डचे हे फिचर ChatGPT प्लसला टक्कर देईल, जे पेड व्हर्जनमध्ये समान फिचर व सेवा देते. गुगल युजर्स आता ­Imagen 2 हे टेक्स्ट-टू-इमेज मॉडेल वापरून फोटो तयार करू शकणार आहेत. चांगली गोष्ट म्हणजे बार्डच्या मदतीने AI फोटोदखील बनवता येणार असून ते फिचर पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही सशुल्क आवृत्ती वापरण्याची गरज नाही. वापरकर्त्यांना फक्त प्रॉम्प्ट शब्द लिहावे लागतील आणि बार्ड त्यानुसार फोटो तयार करेल. Google Bard चे इमेज जनरेटर टूल सध्या फक्त इंग्रजी भाषेत कार्यरत आहे.

सध्या टेलर स्विफ्टचा फेक व्हिडिओ X वर व्हायरल झाल्यावर AI इमेज जनरेटरचा मुद्दा भलताच चर्चेत होता. पण आता हे AI च्या डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे तयार केले गेले आहे. गुगल बार्ड इमेज जनरेटर जेमिनी प्रो मॉडेल सपोर्टसह वापरता येणार आहे. तर ChatGPT Plus पेड सबस्क्रिप्शन GPT-4 मॉडेल वापरते, जे DALL-E 3 इमेज जनरेटर वापरते.

AI फोटोवर असणार वॉटरमार्क

गुगल बार्डच्या मदतीने बनवलेल्या फोटोंवर वॉटरमार्क देण्यात येणार आहे, जेणेकरून हे चित्र आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूलच्या मदतीने तयार करण्यात आले आहे हे कळू शकेल. डीपफेकसारख्या गोष्टी टाळण्यासाठी, बार्ड काही तांत्रिक सूचना वापरणार आहे, जेणेकरून वाईट बाबी टाळता येतील. ImageFX टूल इमेज देखील तयार करू शकेल. AI इमेज जनरेटर टूल्सची व्याप्ती आता फक्त बार्डपुरती मर्यादित नाही. Google ने ImageFX टूल देखील लाँच केले आहे, जे Imagen 2 वर आधारित आहे. त्यावरही प्रॉम्प्ट कमांड देऊन फोटो बनवल्या जाऊ शकतात. Google Bard आता 230 देशांमध्ये एकूण 40 भाषांना सपोर्ट करते. त्यात अरबी, बंगाली, तमिळ आणि उर्दू भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.

Web Title: google bard can generate ai image for free as chatgpt plus rival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.