शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 2:27 PM

जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया. 

ठळक मुद्देसोशल मीडिया अकाऊंटसह अनेक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवा.

नवी दिल्ली - सोशल मीडिया अकाऊंटसह अनेक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पासवर्ड असल्याने काही वेळा ठेवलेला पासवर्ड विसरण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळेच चुकीचा पासवर्ड टाकला जातो. तसेच गुगल अकाउंटवरून लॉगइन करताना अनेकदा लॉगइन होत नसल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जीमेल वर कामासंबंधी महत्त्वाचे काही मेल हे सातत्याने येत असतात. व्यवहारासंदर्भातील माहिती, फाईल्स, फोटो पाठवण्यासाठी जीमेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया. 

पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

- जीमेल ओपन केल्यानंतर सर्वप्रथम Forgot Password वर क्लिक करा.

- पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न करा नाहीतर ‘Try another way’ ऑप्शनवर क्लिक करा. 

- जीमेल अकाऊंटशी लिंक असलेल्या स्मार्टफोनवर नोटीफिककेशन पाठवण्याची परवानगी गुगल तुमच्याकडे मागेल. त्यावेळी त्याला OK म्हणा.

- अकाऊंटशी लिंक असलेला नंबर नसेल तर ‘Try another way’ वर क्लिक करा. 

- गुगल तुमच्याशी संबंधित असलेला कोणताही एक ई-मेल आयडी विचारेल. त्यानंतर कन्फर्मेशन करून वेरिफीकेशन कोड पाठवला जाईल. 

- कोड मिळाल्यानंतर तो कोड डायलॉग बॉक्समध्ये टाका.

-  ही संपूर्ण प्रकिया केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीमेल अकाऊंटचा वापर पुन्हा एकदा करू शकता.

जीमेलचा पासवर्ड बदलण्यासाठी देखील याच स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हवा असलेला पासवर्ड सेट करा. तसेच हॅकिंगचे प्रकार वाढत असल्याने तुमचा पासवर्ड काही काळानंतर बदलत राहा. जीमेलचा पासवर्ड एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवा. यासाठी क्रोममध्ये पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याचा पर्याय देखील उत्तम असून त्याचा विचार करू शकता. 

ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्सगुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले. गुगलने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे. Gmail च्या लेटेस्ट अपडेटमध्ये कंपोज विंडोच्या टास्क बारमध्ये Undo आणि Redo या शॉर्टकटचा समावेश करण्यात आला आहे. नवीन फीचर्स हे टास्कबारच्या एकदम सुरुवातीला अ‍ॅड करण्यात आला आहे. फॉन्ट टाईप आणि फॉन्ट साईझ पर्यायाआधी हे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सना आता मेल करताना या गोष्टीचा अत्यंत फायदा होणार आहे.  

Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणीगुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सना बुधवारी (13 मार्च) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. Gmail, Google Drive अन्  you tube काम करत नसल्याच्या अनेक युजर्सनी तक्रारी केल्या. जीमेलवर साइन इन केल्यानंतरही या समस्यांचा सामना करावा लागला होता. गुगलशी संलग्न असलेल्या अनेक वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ घेत असल्याचंही युजर्सचं म्हणणं होतं. आम्ही जीमेल हाताळण्यास होत असलेल्या समस्यांची चौकशी करत आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही आपल्याला माहिती देऊ. जीमेल लॉगिन होत असलं तरी वापर असताना एरर येत आहेत. एकदा क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एखादा मेल ओपन होत आहे. जीमेलच्या सेवेनं प्रभावित झालेले युजर्सना इतरांना मेल पाठवता येत नाहीत. अशा प्रसंगी पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलने दिला होता.

टॅग्स :googleगुगल