Google's Gmail and Drive suffer global outages | Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी
Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी

वॉशिंग्टन- गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. Gmail, Google Drive अन्  you tube काम करत नसल्याच्या अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत. जीमेलवर साइन इन केल्यानंतरही या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तसेच गुगलशी संलग्न असलेल्या अनेक वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ घेत असल्याचंही युजर्सचं म्हणणं आहे. त्यानंतर गुगलनंही या सर्व प्रकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही जीमेल हाताळण्यास होत असलेल्या समस्यांची चौकशी करत आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही आपल्याला माहिती देऊ. जीमेल लॉगिन होत असलं तरी वापर असताना एरर येत आहेत. एकदा क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एखादा मेल ओपन होत आहे. जीमेलच्या सेवेनं प्रभावित झालेले युजर्सना इतरांना मेल पाठवता येत नाहीयेत. 

अशा प्रसंगी पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलनं दिला आहे. गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्या युजर्सनाही या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचंही गुगलनं मान्य केलं आहे. गुगल मॅप आणि यू ट्युब हाताळण्यासही अनेक अडचणी येत आहे. जीमेल खात्यावर युजर्सच्या असलेल्या फोटोंऐवजी काळी स्क्रीन दिसत असल्याचंही अनेकांच्या तक्रारी आहेत. यू ट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर प्रोसेसिंगवरच अडकून पडत आहे. त्यामुळे तो पब्लिश करता येत नाहीये. 


Web Title: Google's Gmail and Drive suffer global outages
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.