Google देणार सॅमसंगला टक्कर; पुढील वर्षी येऊ शकतो Pixel Foldable Phone फोन 

By सिद्धेश जाधव | Published: November 6, 2021 12:01 PM2021-11-06T12:01:05+5:302021-11-06T12:01:09+5:30

Google Pixel Foldable Phone: पहिला Foldable Pixel फोन पुढल्या वर्षी 2022 च्या पहिल्या सहामाहीत केला जाऊ शकतो. डिजाईन इम्प्रुव्हमेंटसाठी ग्राहकांना कॅमेरा सेन्सरमध्ये तडजोड करावी लागेल.  

Googel Pixel Foldable Phone may launch in 2022  | Google देणार सॅमसंगला टक्कर; पुढील वर्षी येऊ शकतो Pixel Foldable Phone फोन 

Google देणार सॅमसंगला टक्कर; पुढील वर्षी येऊ शकतो Pixel Foldable Phone फोन 

googlenewsNext

स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये फोल्डेबल फोन्सनी नवीन उत्साह आणला आहे. सॅमसंगच्या Foldable Phones या सेगमेंटवर राज्य करत आहेत. परंतु हे जास्त काळ राहणार नाही, कारण शाओमी, हुवावे आणि मोटोरोलानंतर आता ओप्पो आणि गुगल देखील फोल्डेबल सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहेत. गेले कित्येक दिवस गुगलच्या फोल्डेबल फोनची माहिती येत आहे. आता बातमी आली आहे कि Foldable Pixel पुढील वर्षी सादर केला जाऊ शकतो.  

9to5google ने दिलेल्या माहितीनुसार पहिला Foldable Pixel फोन पुढल्या वर्षी 2022 च्या पहिल्या सहामाहीत केला जाऊ शकतो. तसेच कि या फोनमध्ये कंपनी हाय-एन्ड कॅमेरा सेन्सर देणार नाही असे सांगण्यात आले आहे. जसा सेन्सर यावर्षी लाँच झलेल्या Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये वापरण्यात आला आहे. त्यामुळे पिक्सल चाहत्यांची निराशा होऊ शकते, डिजाईन इम्प्रुव्हमेंटसाठी ग्राहकांना कॅमेरा सेन्सरमध्ये तडजोड करावी लागेल.  

Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये 50MP चा रियर कॅमेरा आहे, जो एक Samsung GN1 सेन्सर आहे. रिपोर्टनुसार APK इनसाइड टीमला पिक्सल फोल्डेबल फोनमधील कॅमेऱ्याचे कोडनेम मिळाले आहे. या फोनमधील सेन्सरचे कोडनेम ‘Pipit’ आहे. याआधी हा कोडनेम असलेला सेन्सर Pixel 5 मध्ये मिळाला होता. त्यामुळे गुगलच्या आगामी फोल्डेबल फोनमध्ये पिक्सल 5 मधील कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. जो 12.2-मेगापिक्सलचा Sony IMX363 सेन्सर आहे. त्याचबरोबर फोनमध्ये अजून दोन कॅमेरा असतील जे 8-मेगापिक्सलचे असू शकतात.  

Web Title: Googel Pixel Foldable Phone may launch in 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.