Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:26 IST2026-04-04T17:19:47+5:302026-04-04T17:26:43+5:30

गुगलने जीमेल युजरनेम बदलण्याची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही नवीन अकाउंट न काढता जुने जीमेल आयडी बदलू शकता.

Good news for Gmail users! Now you can change your Gmail ID as you wish; Google's big decision after 22 years | Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय

Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय

तुम्ही सुरुवातीच्या काळात गडबडीत किंवा नकळतपणे तयार केलेल्या जीमेल आयडीमुळे आज ऑफिसमध्ये किंवा प्रोफेशनली संकोच वाटतो का? जर हो, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने आता जीमेलच्या इतिहासातला सर्वात मोठा बदल करत, वापरकर्त्यांना त्यांचे जीमेल युजरनेम बदलण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या २२ वर्षांपासून जीमेल वापरकर्ते ज्या फीचरची आतुरतेने वाट पाहत होते, ते अखेर प्रत्यक्षात आले आहे.

आता जुने अकाउंट डिलीट न करता बदलता येणार नाव!

आतापर्यंत जर कोणाला आपले ईमेल आयडीचे नाव बदलायचे असेल, तर त्यांना जुने अकाउंट बंद करून नवीन अकाउंट उघडावे लागत असे. यामुळे जुन्या ईमेल्स आणि महत्त्वाच्या फाइल्स गहाळ होण्याची भीती असायची. मात्र, आता गुगलने ही अडचण दूर केली आहे. तुम्ही तुमच्या जुन्याच अकाउंटमध्ये राहून '@' चिन्हाच्या आधीचा भाग, म्हणजेच तुमचे युजरनेम बदलू शकणार आहात.

प्रोफेशनल लूकसाठी उत्तम संधी

अनेकदा आपण कॉलेज लाइफमध्ये किंवा सुरुवातीला मजेशीर नावाने ईमेल आयडी तयार करतो, जो नंतर व्यावसायिक कामांसाठी वापरताना अवघडल्यासारखे होते. या नवीन अपडेटमुळे आता युजर्सना आपली डिजिटल ओळख अधिक प्रोफेशनल आणि सुटसुटीत करता येणार आहे. हे फीचर केवळ युजरनेम बदलण्यासाठीच नाही, तर ऑनलाइन ओळख अधिक प्रभावी करण्यासाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे.

भारतात कधी मिळणार सुविधा?

गुगलने सध्या या फीचरची सुरुवात अमेरिकेतील युजर्ससाठी केली आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार, टप्प्याटप्प्याने हे फीचर जगभरात रोलआउट केले जात आहे. लवकरच हे फीचर आशिया आणि युरोपसह भारतामध्येही उपलब्ध होणार आहे. भारतीय युजर्सना यासाठी फारशी वाट पाहावी लागणार नाही, असे संकेत कंपनीने दिले आहेत. या अपडेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तुमचे जुने ईमेल आयडी देखील सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचे मेल गहाळ होण्याची किंवा कोणाशी संपर्क तुटण्याची भीती उरणार नाही.

Web Title : जीमेल में 22 साल बाद यूजरनेम बदलने का विकल्प: खुशखबरी!

Web Summary : जीमेल उपयोगकर्ता अब अकाउंट डिलीट किए बिना यूजरनेम बदल सकते हैं, जिसका इंतजार 22 सालों से था। यह एक अधिक पेशेवर डिजिटल पहचान का अवसर प्रदान करता है; सुविधा विश्व स्तर पर शुरू हो रही है, जल्द ही भारत में, पुराने आईडी सक्रिय रखते हुए।

Web Title : Gmail to Allow Username Changes After 22 Years: Good News!

Web Summary : Gmail users can now change usernames without deleting accounts, a feature awaited for 22 years. This offers a chance for a more professional digital identity; the feature is rolling out globally, soon in India, keeping old IDs active.