iPhone 13 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय १९ हजारांपर्यंतचा बंपर डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:27 IST2022-08-02T15:25:44+5:302022-08-02T15:27:03+5:30

iPhone 13 हा तुम्हाला मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करता येणार आहे.

Golden opportunity to buy iPhone 13 get a bumper discount of up to 19 thousand flipkart exchange offer | iPhone 13 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय १९ हजारांपर्यंतचा बंपर डिस्काऊंट

iPhone 13 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय १९ हजारांपर्यंतचा बंपर डिस्काऊंट

तुम्ही जबरदस्त ऑफर आणि मोठ्या डिस्काऊंटसह iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. iPhone 14 लाँच होण्यापूर्वी Flipkart वर iPhone 13 बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. iPhone 13 चे बेस मॉडेल (128GB) सध्या Flipkart वर 73,909 रुपयांच्या किंमतीसह लिस्टेड आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 19 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फोन खरेदी करू शकता. हा 73,909 रुपयांचा फोन पूर्ण एक्सचेंज बोनस आणि अतिरिक्त सवलतींसह 54,909 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो.

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. रिअर कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही 4k डॉल्बी व्हिजन HDR व्हिडीओही शूट करू शकता. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

iPhone 14 मध्ये काय असेल?
iPhone 14 सीरीजसह कंपनी कॅमेरा सेटअपमध्ये मोठे बदल करू शकते. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार Apple नव्या सीरिजच्या प्रो व्हेरिअंटमध्ये 48-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते. याशिवाय, र्युझर्सना आयफोन 14 सीरिजमध्ये मागील सीरिजपेक्षा थोडी चांगली बॅटरी लाइफ देखील मिळू शकते.

Web Title: Golden opportunity to buy iPhone 13 get a bumper discount of up to 19 thousand flipkart exchange offer