शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 15:16 IST

ही सुविधा यापूर्वी वेबसाईटवरच देण्यात आली होती.

मुंबई : गुगलने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या Gmail च्या सुविधांमध्ये बदल केले होते. आता गुगलने जीमेलच्या अॅप्समध्ये आणखी एक खतरनाक फिचर वाढविले आहे. Confidential Mode असे या सुविधेचे नाव असून तो यापूर्वी वेबसाईटवरच देण्यात आला होता. आता तो अँड्रॉईड आणि आयओएसवरही उपलब्ध होणार आहे. 

Confidential Mode चालू केल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला मेल पाठविला असेल तर तो ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होणार आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला या मोडमधून मेल केला असेल आणि या मेलची वेळ मर्यादा एक दिवसाची ठेवली असेल तर तो 24 तासांनी त्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून आपोआप डिलीट होणार आहे. ही सुविधा Android आणि ios या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आहे. यासाठी हे अॅप अपडेट करण्याची गरजही नाही. गुगल आपल्या सर्व्हरसाईड अपडेटवरून ते करत आहे. 

 काय करावे लागेल? Confidential Mode मध्ये मेल करण्यासाठी आपल्याला केवळ मेल करताना उजव्या बाजुला दिलेल्या तीन डॉटच्या बटनावर क्लीक करावे लागेल. तेथे Confidential Mode चा पर्याय दिसेल. तेथे क्लीक केल्यानंतर तुम्ही कमीतकमी 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंत मेलची मर्यादा सेट करू शकता. हा मेल ज्याला पाठविला आहे तो व्यक्ती, हा मेल पुढे फॉरवर्ड, कॉपी, पेस्ट किंवा डाऊनलोड करु शकणार नाही.  

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११