मस्तच! जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 15:16 IST2018-08-18T15:09:08+5:302018-08-18T15:16:52+5:30

ही सुविधा यापूर्वी वेबसाईटवरच देण्यात आली होती.

Gmail android and ios app got confidential mode feature | मस्तच! जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार

मस्तच! जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार

मुंबई : गुगलने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या Gmail च्या सुविधांमध्ये बदल केले होते. आता गुगलने जीमेलच्या अॅप्समध्ये आणखी एक खतरनाक फिचर वाढविले आहे. Confidential Mode असे या सुविधेचे नाव असून तो यापूर्वी वेबसाईटवरच देण्यात आला होता. आता तो अँड्रॉईड आणि आयओएसवरही उपलब्ध होणार आहे. 


Confidential Mode चालू केल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला मेल पाठविला असेल तर तो ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होणार आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला या मोडमधून मेल केला असेल आणि या मेलची वेळ मर्यादा एक दिवसाची ठेवली असेल तर तो 24 तासांनी त्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून आपोआप डिलीट होणार आहे. ही सुविधा Android आणि ios या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आहे. यासाठी हे अॅप अपडेट करण्याची गरजही नाही. गुगल आपल्या सर्व्हरसाईड अपडेटवरून ते करत आहे. 

 काय करावे लागेल? 
Confidential Mode मध्ये मेल करण्यासाठी आपल्याला केवळ मेल करताना उजव्या बाजुला दिलेल्या तीन डॉटच्या बटनावर क्लीक करावे लागेल. तेथे Confidential Mode चा पर्याय दिसेल. तेथे क्लीक केल्यानंतर तुम्ही कमीतकमी 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंत मेलची मर्यादा सेट करू शकता. हा मेल ज्याला पाठविला आहे तो व्यक्ती, हा मेल पुढे फॉरवर्ड, कॉपी, पेस्ट किंवा डाऊनलोड करु शकणार नाही. 
 

Web Title: Gmail android and ios app got confidential mode feature