मोफत मिळणार Gemini आणि ChatGPT चे हजारो रुपयांचे प्लान्स; फक्त एवढंच करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:21 IST2026-01-01T18:21:06+5:302026-01-01T18:21:15+5:30
भारतात AI चा वापर झपाट्याने वाढतोय.

मोफत मिळणार Gemini आणि ChatGPT चे हजारो रुपयांचे प्लान्स; फक्त एवढंच करा...
गेल्या काही काळापासून भारतात AI चा वापर झपाट्याने वाढतोय. अधिकाधिक लोकांनी याचा वापर करावा, यासाठी गूगल, ओपनएआय आणि परप्लेक्सिटी यांसारख्या आघाडीच्या AI कंपन्या भारतात आपले हजारो रुपयांचे प्रीमियम एआय प्लान्स मोफत देत आहेत. विशेष म्हणजे, टेलिकॉम कंपन्यांशी भागीदारी करत या सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
भारतामध्ये मोफत मिळणारे प्रीमियम AI प्लान्स
1) Google Gemini AI Pro - जिओ युजर्ससाठी 18 महिने फ्री
Google भारतात Reliance Jio युजर्सना आपला Gemini AI Pro प्लान 18 महिन्यांसाठी मोफत देत आहे. या प्लानअंतर्गत युजर्सना Gemini Advanced AI Models, Veo (AI व्हिडिओ जनरेशन टूल) आणि Nano Banana Pro सारख्या अत्याधुनिक एआय टूल्सचा वापर करता येणार आहे.
अट काय?
जिओच्या अशा कोणत्याही रिचार्ज प्लानवर रिचार्ज करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये Unlimited 5G Data दिला जातो. रिचार्जनंतर Gemini AI Pro प्लान आपोआप अॅक्टिव्ह होतो.
2) ChatGPT Go - OpenAI कडून वर्षभर मोफत
OpenAI ने गेल्या नोव्हेंबरमध्ये आपला ChatGPT Go प्लान मोफत करण्याची घोषणा केली होती. साधारणपणे ₹399 प्रतिमहिना किंमत असलेला हा प्लान आता कोणताही भारतीय युजर वर्षभर मोफत वापरू शकतो.
या प्लानमध्ये Image Generation Limits वाढते, Long term Memory Support, फास्ट आणि अॅढव्हान्स AI प्रतिसाद सारखे फीचर्स मिळतात. हा प्लान थेट ChatGPT प्लॅटफॉर्मवर जाऊन सबस्क्राइब करता येतो.
3) Perplexity AI – Airtel युजर्ससाठी 1 वर्ष फ्री
Perplexity AI ने Airtel सोबत भागीदारी करत Airtel युजर्सना 1 वर्षासाठी Perplexity AI Pro प्लान मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑफरमध्ये Perplexity AI Pro चा Access मिळतो. नवीन AI Browser ‘Comet’ चा अॅक्सेसदेखील दिला जातो. यासाठी कोणतीही अट नाही. Airtel युजर्स थेट हा प्लान अॅक्टिव्ह करू शकतात.
AI कंपन्यांची भारतावर विशेष नजर
तज्ज्ञांच्या मते, भारतातील मोठा युजर बेस, वेगाने वाढणारी डिजिटल इकॉनॉमी आणि 5G चा विस्तार यामुळे एआय कंपन्या भारतात आक्रमक धोरण राबवत आहेत. सुरुवातीला प्रीमियम सेवा मोफत देऊन युजर्सना एआय इकोसिस्टीमशी जोडणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.