13 हजारांच्या आत पूर्ण करा iPhone घेण्याचं स्वप्न; ऑनलाईन सेलमध्ये मिळतोय अविश्वसनीय डिस्काउंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:55 IST2022-02-24T15:55:15+5:302022-02-24T15:55:38+5:30

Flipkart Month End Mobiles Fest: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अ‍ॅप्पलचा सर्वात स्वस्त आयफोन अजून स्वस्त झाला आहे.  

Flipkart month end mobiles fest buy iphone se at just 12799 rupees check offers and deals  | 13 हजारांच्या आत पूर्ण करा iPhone घेण्याचं स्वप्न; ऑनलाईन सेलमध्ये मिळतोय अविश्वसनीय डिस्काउंट 

13 हजारांच्या आत पूर्ण करा iPhone घेण्याचं स्वप्न; ऑनलाईन सेलमध्ये मिळतोय अविश्वसनीय डिस्काउंट 

Flipkart Month End Mobiles Fest: फ्लिपकार्टवर मंथ अँड मोबाईल्स फेस्ट सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन स्वस्तात मिळत घेत. यात Apple च्या सर्वात स्वस्त डिवाइसचा देखील समावेश आहे. डिस्काउंट आणि ऑफर्स इतक्या आहेत कि फ्लिपकार्टवर Apple iPhone SE स्मार्टफोन फक्त 12,799 रुपयांमध्ये विकला जात आहे.  

ऑफर्स आणि डिस्काउंट  

Apple iPhone SE च्या 64GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 39,900 रुपये आहे. परंतु यावर फ्लिपकार्ट 10,601 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे या फोनची किंमत 29,299 रुपये झाली आहे. ही किंमत देखील अनेकांना परवडणारी आहे. परंतु जर तुम्ही IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं या आयफोनची खरेदी केली तर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटनंतर हा मोबाईल 28,299 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 15,500 रुपयांची सूट मिळवू शकता. म्हणजे उर्वरित 12,799 रुपये देऊन तुम्ही आयफोन घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.  

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स 

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.   

हे देखील वाचा:

Web Title: Flipkart month end mobiles fest buy iphone se at just 12799 rupees check offers and deals