गुप्त कॅमेरा, कुठेही चिकटवता येतो, मोबाईलमध्ये HD रेकॉर्डिंग पाहता येते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:35 IST2022-01-21T15:34:49+5:302022-01-21T15:35:48+5:30
घरातून बाहेर गेल्यावर जर तुम्हाला तुमच्या घरावर लक्ष ठेवायचं असेल तर त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक असतो. असाच एक छोटा सीसीटीव्ही कॅमेरा फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

गुप्त कॅमेरा, कुठेही चिकटवता येतो, मोबाईलमध्ये HD रेकॉर्डिंग पाहता येते
घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेकदा घरावर लक्ष ठेवण्याची गरज असते. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टमचा वापर केला जातो. परंतु एवढ्या मोठ्या आणि महागड्या सिस्टमची गरज प्रत्येक वेळी नसते. यावर पर्याय म्हणून मार्केटमध्ये अनेक छोटे सिक्योरिटी कॅमेरे उपलब्ध आहेत. आज अशाच एका सिक्योरिटी कॅमेऱ्याची माहिती आपण घेणार आहोत. जो छोटा आहे, कुठेही चिटकवता येतो आणि फ्लिपकार्टवर तो डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
OJXTZF Mini Wifi Camera
हा खूप छोटा कॅमेरा आहे आणि याचा आकार एखाद्या कंप्यूटर माउस पेक्षा देखील छोटा आहे. या कॅमेऱ्याच्या मागे चुंबक देण्यात आला आहे त्यामुळे हा कुठल्याही लोखंडी सर्फेसवर सहज चिटकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा अँगल सेट करू शकता. यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. ज्यात 128 जीबी पर्यंतच्या एसडी कार्डचा वापर करता येतो. या कार्डवर तुमचं सर्व रेकॉर्डिंग सेव्ह राहते.
या कॅमेऱ्यात हाय डेफिनेशन व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. तसेच यातील नाईट व्हिजन फिचर तुम्हाला रात्रीचं रेकॉर्डिंग देखील समजेल. सोबत मोबाईल डिटेक्शनसह लूप रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफ असे फिचर देखील देण्यात आले आहेत. यातील मोशन डिटेक्शन फिचर देखील खास आहे.
किंमत
या छुप्या आणि छोट्या कॅमेऱ्याची मूळ किंमत 2,499 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये 44 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा कॅमेरा फ्लिपकार्टवरून फक्त 1389 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी
दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा