Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 01:29 PM2022-01-21T13:29:17+5:302022-01-21T13:29:49+5:30

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, हा Android 12 ऑक्टा-कोर Exynos 1200 चिपसेटसह बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Samsung galaxy m33 5g phone might launch in india by the end of february 2022  | Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

Next

Samsung भारतातील 5G Phone सेगमेंटमध्ये सक्रिय होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार आता हालचाल सुरु झाल्याचं दिसतं आहे. सध्या कंपनी आगामी Samsung Galaxy M33 5G काम करत आहे. या महिन्यात हा स्मार्टफोन येणार होता परंतु आता सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं दिली आहे.  

फेब्रुवारी 2022 च्या सुरुवातीला भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. परंतु प्लॅनिंग बदलल्यास लाँच शेवटच्या आठवड्यात ढकलला जाऊ शकतो. अचूक अशी तारीख मात्र समोर आली आहे. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन Android 12 ऑक्टा-कोर Exynos 1200 चिपसेटसह बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy M33 5G चे संभाव्य स्पेक्स 

गिकबेंचच्या लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन सॅमसंगच्या Exynos 1200 SoC सह बाजारात येईल. सोबत 6GB RAM दिला जाऊ शकतो. यापेक्षा जास्त रॅम व्हेरिएंट देखील बाजारात दाखल होऊ शकतात. या आगामी सॅमसंग फोनमध्ये अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4 दिला जाऊ शकतो. परंतु Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनची खासियत यातील 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी असेल. ही बॅटरी कंपनी फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करू शकते.  

हे देखील वाचा:

8GB रॅम असलेला फाडू Realme स्मार्टफोन येतोय; 50W फास्ट चार्जिंगनं काही मिनिटांत रेडी होईल मोबाईल

दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा

Web Title: Samsung galaxy m33 5g phone might launch in india by the end of february 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.