Flipkart Sale: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत 30 हजारांची Smart TV; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:42 IST2022-03-12T16:42:12+5:302022-03-12T16:42:20+5:30
Flipkart Big Saving Days Sale: आजपासून सुरु झालेल्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्स डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. या सेलमध्ये तुम्ही 42-इंचाची स्मार्ट टीव्ही 30 हजारांच्या ऐवजी फक्त 7,749 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Flipkart Sale: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत 30 हजारांची Smart TV; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर
Flipkart Big Saving Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टनं आजपासून बिग सेविंग डेज सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये 16 मार्चपर्यंत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि स्मार्टफोन्स सारखे अनेक प्रोडक्ट्स डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. परंतु या सेलमधील लक्ष वेधून घेणारी डील तर एका स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Blaupunkt ची 42-इंचाची स्मार्ट टीव्ही खूप कमी किंमतीत विकत घेता येत आहे.
किंमत आणि ऑफर्स
Blaupunkt Cybersound 42 Inch Full HD LED Smart Android TV ची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. परंतु सेलमध्ये या टीव्हीवर 33 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे ही टीव्ही फक्त 19,999 रुपयांमध्ये विकली जात आहे. त्यावर एसबीआय कार्ड धारकांना 10 टक्के म्हणजे 1,250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच तुमची जुनी टीव्ही एक्सचेंज करून तुम्ही 11 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे या स्मार्ट टीव्हीची प्रभावी किंमत फक्त 7,749 रुपये होईल.
स्पेसिफिकेशन्स
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट मिळतात. यातील 42 इंचाचा डिस्प्ले फुल एचडी रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यातील 40W चे स्पिकर्स दमदार साऊंड देतात. ही स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही
- चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच
- पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी