फ्लिपकार्टचा 'फ्लिपस्टार्ट' सेल, ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

By ravalnath.patil | Published: November 30, 2020 06:24 PM2020-11-30T18:24:20+5:302020-11-30T18:24:59+5:30

flipkart : फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, फ्लिपस्टार्ट सेलदरम्यान ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स व इतर वस्तूंवर ८०% सवलत मिळू शकते.

flipkart announces flipstart days sale from december 1 | फ्लिपकार्टचा 'फ्लिपस्टार्ट' सेल, ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

फ्लिपकार्टचा 'फ्लिपस्टार्ट' सेल, ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

Next
ठळक मुद्देफ्लिपस्टार्ट सेलदरम्यान इअरफोन, वेअरेबल्स आणि कॅमेऱ्यावरही सूट मिळेल. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध असणार आहे.

नवी दिल्ली : फ्लिपकार्टने फ्लिपस्टार्ट या नावाने सेलची घोषणा केली आहे. कंपनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या तारखेला जवळजवळ प्रत्येक कॅटगरीवर सूट देईल, असे ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने म्हटले आहे. 

साधारणत: ई-कॉमर्स कंपन्या वर्षातील जवळजवळ ३६५ दिवस काही-ना-काही नावानं सेल चालवतात. यामध्ये बऱ्याचदा किंमतींमध्ये थोडीफार फेरफार करून सेलच्या नावावर ग्राहकांना आकर्षित केले जाते. फ्लिपकार्टचा हा नवीन फ्लिपस्टार्ट सेल १ डिसेंबरपासून सुरू होणार असून 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटवर सवलतीच्या ऑफरबद्दलही नमूद केले आहे, जी जवळपास प्रत्येक कॅटगरीवर उपलब्ध असणार आहे. यासाठी एक खास लँडिंग पेज तयार केले गेले आहे. फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, फ्लिपस्टार्ट सेलदरम्यान ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स व इतर वस्तूंवर ८०% सवलत मिळू शकते. लॅपटॉपवर ३०% सूट देण्यात आली आहे.

फ्लिपस्टार्ट सेलदरम्यान इअरफोन, वेअरेबल्स आणि कॅमेऱ्यावरही सूट मिळेल. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध असणार आहे. मोबाईल अ‍ॅक्सेसरीजशिवाय एसी, टीव्ही आणि इतर प्रोडक्ट्स सुद्धा ५० % पर्यंत सवलतीत उपलब्ध असतील. इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स व्यतिरिक्त ग्राहकांना फुटवेअर आणि कपड्यांच्या कॅटगरीत सूट देण्यात येणार आहे. तसेच, ब्युटी, स्पोर्ट्स आणि फर्निचरच्या सुद्धा कॅटगरीवर हा सेल लागू असणार आहे.
 

Web Title: flipkart announces flipstart days sale from december 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.