खोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:59 IST2017-11-06T16:36:50+5:302017-11-06T16:59:22+5:30
या अॅप डेव्हलपरने गुगलच्या सुरक्षेला ठेंगा दाखवला आहे.हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसत असल्यामुळे आणि नावही हुबेहूब दिल्यामुळे लाखो युझर्सची फसवणूक

खोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना?
मुंबई: गुगलच्या सुरक्षेला ठेंगा दाखवत WhatsApp चं बनावट अॅप प्ले स्टोअरवर आहे, हैराण करणारी गोष्ट म्हणजे तब्बल 10 लाखांहून जास्त युझर्सनी हे अॅप डाउनलोडही केलं आहे. प्ले स्टोअरवर Update WhatsApp नावाचं एक अॅप असून हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसत असल्यामुळे लाखो युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलं.
Fake WhatsApp Update on #GooglePlay . Under the "same" dev name. Incl. a Unicode whitespace. One Million downloadshttps://t.co/qjqxd6n6HPpic.twitter.com/dmvTksqpuP
— Nikolaos Chrysaidos (@virqdroid) November 3, 2017
सर्वात धोकादायक म्हणजे हे बनावट अॅप देखील WhatsApp Inc डेव्हलपरच्या म्हणजे ख-या डेव्हलपरच्या नावाने आहे. बनावट अॅप ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या डेव्हलपरने नावही हुबेहूब दिल्यामुळे लाखो युझर्सची फसवेगिरी झाली.
हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं असावं, असं बोललं जात आहे. यापूर्वीही अॅपलची वेबसाइट apple.com युनिकोडद्वारे ओपन करून फसवणूकीचा प्रकार समोर आला होता.
रेडिट युझरने या अॅपचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलं आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसतं आणि दुसरे कोड दिसत नाहीत.
अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जगभरात अब्जावधी लोकंव्हॉट्सअॅपचा वापर करतात, अशात तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहण्याची गरज आहे.