शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Facebook मेसेंजरवरून हटवले जाणार 'हे' इंट्रेस्टिंग फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 10:22 AM

फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं.

ठळक मुद्देफेसबुक लवकरच आपल्या मेसेंजरवरून इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हटवणार आहे. इन्स्टंट गेम्स हे मेसेंजरवरून हटवण्यात येणार असून ते फेसबुकच्या मेन अ‍ॅपमध्ये शिफ्ट करण्यात येतील. मेसेंजर अ‍ॅप अधिक जलद करण्यासाठी फीचर हटवण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकने काही दिवसांपूर्वीच आपल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये मेसेंजर अ‍ॅप पहिल्यापेक्षा अधिक चांगलं आणि जलद करण्यासाठी योग्य ते बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. फेसबुक आता आपल्या मेसेंजर प्लॅटफॉर्मवरून काही फीचर कमी करणार आहे. तसेच फेसबुक लवकरच आपल्या मेसेंजरवरून इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टंट गेम्स हे मेसेंजरवरून हटवण्यात येणार असून ते फेसबुकच्या मेन अ‍ॅपमध्ये शिफ्ट करण्यात येतील. मेसेंजरमध्ये सध्या युजर्ससाठी लूडो क्लब, बास्केटबॉल, वर्ड्स विद फ्रेंड्स फ्रेंजी, Pac-Man आणि स्पेस इंवेडर्स सारखे इंट्रेस्टिंग गेम उपलब्ध आहेत. यामुळे युजर्स आपल्या फ्रेंड्ससोबत चॅटींग आणि गेमिंगची मजा अनुभवत होते. मात्र मेसेंजर अ‍ॅप अधिक जलद करण्यासाठी इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हटवण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुक गेम्स पार्टनरशिपचे ग्लोबल डायरेक्टर लियो ऑलीब यांनी ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टंट गेमिंग (Instant Game) फीचर हे फेसबुकच्या मेन अ‍ॅपवर शिफ्ट करण्यात येणार आहे. असं केल्यास फेसबुक मेसेंजर हे अधिक चांगलं आणि जलद होणार आहे. मायक्रेशनची ही प्रक्रिया हळूहळू केली जाणार आहे. मायग्रेशन दरम्यान मेसेंजर अ‍ॅप सर्वात प्रथम आयओएस युजर्ससाठी काम करणं बंद करणार आहे. तसेच मायग्रेशन पूर्ण झाल्यानंतर युजर्स फेसबुकच्या मेन अ‍ॅपवरून गेम लाँच करू शकतात अशी माहिती कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. 

चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.   

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसंफेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अ‍ॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अ‍ॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे.  अ‍ॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अ‍ॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अ‍ॅप केवळ 18 वर्षांपेक्षा  जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.

Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणारसोशल मीडिया फेसबुक आपल्या 2 अब्ज 30 कोटी युजर्ससाठी न्यूज फीडमध्ये काही फेरबदल करणार आहे. या बदलानंतर लवकरच युजर्सना त्यांचे खास मित्र-मैत्रिणी त्यांच्या फीडमध्ये टॉपवर दिसणार आहेत. फेसबुकने यासाठी अनेक पोस्टचं सर्वेक्षण केलं आहे. युजर्सना नेमकं काय पाहायला आवडतं. याचा रिसर्च केला. फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे दोन रँकींग अपडेट करण्याची घोषणा केली आहे. युजर्सच्या आवडीच्या व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं असून फेसबुकवर ते टॉपमध्ये दिसणार आहेत. जर एका फोटोमध्ये टॅग केलं जात असेल तर किंवा एखाद्या पोस्टवर कमेंट येत असेल तर फेसबुक पॅटर्न दिसणार आहे. या सर्व गोष्टींचा वापर हा अल्गोरिदम ठरवण्यासाठी केला जाणार आहे. 

 

टॅग्स :FacebookफेसबुकMessengerमेसेंजर