शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 2:45 PM

फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली - जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक असलेलं फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुक संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण फेसबुक लवकरच युजर्ससाठी प्रायव्हसीच्या दृष्टीने चार नवीन दमदार फीचर्स आणणार आहे. कंपनीनं आपलं प्रायव्हसी चेकअप टूल अपडेट केलं आहे. 

फेसबुकने चार नवीन फीचर्स रोल आऊट केले आहेत. यामध्ये युजर्स अकाऊंटची सुरक्षितता जास्त उत्तमपणे आता मॅनेज करू शकतात. तसेच आपल्या माहितीवर कंट्रोल ठेवू शकतात. कंपनीने 2014 मध्ये प्रायव्हसी चेकअप टूल लाँच केलं होतं. मात्र आता लवकर फेसबुकच्या या टूलचं अपडेटेड व्हर्जन रोल करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. नवीन फीचर्सबाबत जाणून घेऊया. Who can see what you share

'हू कॅन सी व्हॉट यू शेयर' या फीचरच्या मदतीने शेअर केलेली इन्फॉर्मेशन कोण पाहत आहे याबाबतची माहिती मिळत आहे. यामध्ये फोन नंबर, ई-मेल आणि पोस्टसारख्या माहितीचा समावेश आहे. 

How to keep your account secure

'हाऊ टू कीप यूअर अकाऊंट सेफ' या फीचरच्या मदतीने अकाऊंट हे जास्त मजबूत पासवर्ड आणि लॉगिन अलर्टने सुरक्षित करता येईल. फेसबुकने आपल्या एका ब्लॉकमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. 

How people can find you on Facebook

'हाऊ पीपल कॅन फाईंड यू' या फीचरच्या मदतीने फेसबुकवर कोण तुम्हाला शोधू शकतं अथवा कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतं हे ठरवता येणार आहे.

Your data settings on Facebook

डेटा सेटिंग्स या फीचरच्या मदतीने युजर्स अ‍ॅप्ससोबत शेअर केलेली माहिती रिव्हयू करू शकतात. तसेच जे अ‍ॅप कामाचं नाही त्यांना रिमूव्ह करता येतं. 

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या मीम्सने धुमाकूळ घातला आहे. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण फेसबुकने मीम्स तयार करणारं एक अ‍ॅप लाँच केलं आहे. Whale असं या अ‍ॅपचा नाव असून सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि न्यू प्रॉडक्ट एक्सपेरिंमेंटेशन (एनपीई) टीमने एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स स्टॉक लायब्ररीमधून फोटो अ‍ॅड करून मीम्स तयार करू शकतात. तसेच सोशल मीडिया किंवा मेसेज थ्रेडवर शेअर करण्याआधी अनेक इफेक्ट्स देता येणार आहे.

'या' बातम्याही नक्की वाचा

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

व्हॉट्स अ‍ॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

काय सांगता? इंटरनेटशिवाय आता शेअर करता येणार फोटो, व्हिडीओ

 

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल