शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:04 PM

फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे.

ठळक मुद्देफेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

नवी दिल्ली - गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. 

फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. इन्स्टाग्रामवरही युजर्सना ही सुविधा मिळणार आहे. फेसबुकने आपल्या एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली असून ही सुविधा सुरू झाली असून भारतीय युजर्स हजारो लाइक्स असलेलं इंडियन म्युझिक फेसबुकवर आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत शेअर करू शकतात. यामुळे युजर्सची पोस्ट ही अधिक अर्थपूर्ण होणार आहे. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही भारताच्या संगीत उद्योगासोबत करण्यात येणाऱ्या करारासाठी उत्सूक आहोत. भारतातील युजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आवडती गाणी पोस्ट करता यावी हा यामागचा उद्देश आहे. या करारानंतर गली बॉयमधील अपना टाइम आएगा यासह नवीन, जुनी गाणी वापरता येणार आहेत. 

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत.  Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे. 

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचरFacebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.  

टॅग्स :Facebookफेसबुक