फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 10:40 AM2019-01-26T10:40:12+5:302019-01-26T10:40:31+5:30

न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झकरबर्ग यांना सुचली आहे.

you can send message from Facebook to WhatsApp, Instagram soon... | फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

Next

मुंबई : गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबूक कंपनी नवनवीन फिचर आणत असते. आता फेसबुकवरूनइन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबूकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरेतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्य़ाची तयारी करत आहे. 


न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 


ही मॅसेज पाठिवण्याची प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षितच असणार आहे. ही प्रणाली आजही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरली जाते, ज्यामुळे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही. 


फेसबुकने ही सुविधा कधी सुरु करणार हे अद्याप सांगितले नसले तरीही 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला सुर होण्याच संकेत दिले आहेत. फेसबुकने एका व्यक्तव्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही मॅसेंजिंगचा अनुभव आणखी चांगला देऊ इच्छित आहोत. 
या क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेंजिंग सुविधेचा एवढा परिणाम होणार आहे, की फेसबुकवर वेळ घालवणाऱ्या लोकांचे प्रमाण कमालीचे वाढणार आहे. तसेच गुगलच्या मॅसेंजिंग आणि अ‍ॅपलच्या आय मॅसेजला टक्कर देऊ शकणार आहे. त्याचबरोबर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे विलिनिकरणही होण्याची शक्यता आहे. 

Web Title: you can send message from Facebook to WhatsApp, Instagram soon...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.