Free Internet Broadband : दिवसभर मोफत लुटा हायस्पीड इंटरनेटचा आनंद, या Broadband कंपनीनं आणली नवी पॉलिसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:12 IST2022-08-14T16:11:29+5:302022-08-14T16:12:34+5:30
High Speed Broadband : कंपनीनं आणलेल्या या पॉलिसीनुसार तुम्हा मोफत हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय म्हटलंय कंपनीनं?

Free Internet Broadband : दिवसभर मोफत लुटा हायस्पीड इंटरनेटचा आनंद, या Broadband कंपनीनं आणली नवी पॉलिसी
High Speed Broadband : तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट सेवा संपूर्ण दिवस मोफत वापरण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? अशाच प्रकारची सुविधा एका ब्रॉडबँड कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. एक्सायटेल ब्रॉडबँड (Excitel Broadband) या कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अतिशय उत्तम सोल्युशन सॉल्विंग पॉलिसी आणली आहे. नव्या पॉलिसी अंतर्गत कंपनीनं जर वेळेत ग्राहकांची कनेक्टिव्हीटीची समस्या सोडवली नाही, तर ग्राहकांना दिवसभर हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. पाहूया काय आहे ही पॉलिसी…
Excitel ब्रॉडबँड कंपनी आपल्या ग्राहकांना केवळ चार तासांत त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत आहे. कंपनीने आपल्या टर्म अँड कंडिशन पेजमध्ये म्हटले आहे की तक्रार दाखल केल्यापासून पुढील चार तासांच्या आत, जर ग्राहकाच्या समस्येचे निराकरण झाले नाही, तर तो ग्राहक एक्सायटेलकडून एका दिवसाच्या अतिरिक्त सेवेसाठी पात्र असेल. यासाठी त्या व्यक्तीला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
चार तासांमध्ये ज्यात एक्सायटेल कनेक्टिव्हीटीच्या समस्येचं निराकरण करू शकणार नाही, याच्या मोबदल्यात कंपनी आपल्या ग्राहकांना २४ तासांसाठी अतिरिक्त सेवा देणार आहे. परंतु समस्येचं निराकारण करण्यासाठी कंपनीनं सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे. रात्री ९ नंतर किंवा सकाळी ९ पूर्वी दाखल केलेल्या तक्रारी या नियम आणि अटींनुसार मानल्या जाणार नसल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
अनेक परवडणारे प्लॅन्स
एक्सायटेल आपल्या ग्राहकांना परवडणारे प्लॅन देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला परवडणारे ब्रॉडबँड प्लॅन्स हवे असतील तर एक्सायटेलचे प्लॅन्स तुम्हाला घेता येतील. कंपनी लवकरच अन्य शहरांमध्ये विस्तार करण्याच्या तयारीत आहे. तुमच्या शहरात ही कंपनी सेवा पुरवते का नाही हे तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.