डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:28 IST2025-01-23T18:27:53+5:302025-01-23T18:28:08+5:30
स्टारगेट हा प्रोजेक्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन प्रकल्प आहे. हा अमेरिकेतील AI चा मोठा प्रोजेक्ट आहे, यावरुन जगभरात अमेरिकेच मोठ नाव होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले
अमेरिकेत सत्तांत्तर झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना दोन दिवसापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. देशात मजबूत एआय पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या उद्देशाने ट्रम्प यांनी संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी ५०० अब्ज डॉलर्स खर्च केले जातील असं जाहीर केले. ट्रम्प यांच्या या प्रकल्पाला 'स्टारगेट' असे नाव देण्यात आले आहे. त्यात तंत्रज्ञान उद्योगातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
थायलंडमध्ये समलिंगी विवाह कायदा लागू, हा निर्णय घेणारा आशियातील तिसरा देश बनला
या प्रकल्पाचा भर डेटा डेंट्रे आणि एआय इनोव्हेशनवर असेल. या उपक्रमात तंत्रज्ञान भागीदार म्हणून आर्म होल्डिंग्ज, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीडिया देखील महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रकल्पात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुरुवातीला १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक लागेल. या प्रकल्पामुळे अमेरिकेला एआयच्या जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळेल, असं बोललं जात आहे.
दिग्गजांनी घेतला सहभाग
या घोषणेसाठी आयोजित कार्यक्रमात ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, सॉफ्टबँकचे सीईओ मासायोशी सन, ओरॅकलचे सीटीओ लॅरी एलिसन आणि ट्रम्प यांच्यासह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता.
स्टारगेट प्रोजेक्ट काय आहे?
स्टारगेट हा अमेरिकेचा प्रकल्प आहे, यात देशाला एआयच्या जगात एक नवीन ओळख मिळवून देण्यास मदत करेल. एआय क्षेत्राला बळकटी देण्यासाठी डिझाइन केलेला एक विशेष उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होतील. ओपनएआयने त्यांच्या एक्स हँडलवर या प्रकल्पाची माहिती दिली आहे.
इलॉन मस्क काय म्हणाले?
सॅम ऑल्टमन यांना चॅटजीपीटीमागील प्रकल्प सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सॉफ्टबँकला आर्थिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर इलॉन मस्क यांनी स्टारगेटवर आक्षेप घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प, ऑल्टमन आणि त्यांचे भागीदार स्टारगेट यांनी या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करत आहेत. मस्क सारख्या दिग्गजांनी त्याच्या संभाव्यतेवर शंका घेतली आहे तरीही त्यांनी कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. इलॉन मस्क स्वतः सरकारचे सहयोगी आहेत, पण ते ट्रम्प यांच्या या प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मस्क म्हणाले की, या प्रकल्पात ज्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ते पुढे नेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असा आक्षेप नोंदवला आहे.