गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:39 PM2017-09-18T16:39:14+5:302017-09-18T16:39:59+5:30

तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे.

Earn more than 2500 rupees from Google's fast app, do so. | गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

Next

नवी दिल्ली, दि. 18 -  तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे. या अॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्वीकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच, हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला ते थेट बँक खात्याशी जोडता येईल. तेज अॅपद्वारे पैशांचे ट्रान्सफर सोपे आणि सुरक्षित असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. 
विशेष म्हणजे, या अॅपच्यामाध्यमातून आपल्याला जादा इन्कम मिळवता येणार आहे. यासाठी आपल्या मित्रांना ‘तेज’ अॅपचा वापर करायला सांगितले पाहिजे. जर एका महिन्यात तुम्ही आपल्या 20 मित्रांना ‘तेज’ अॅपचा वापर करण्यास सांगितले आणि ते यशस्वी झाले तर तुम्हाला यातून 1000 रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय या अॅपच्यामाध्यमातून इतर ऑफर्समधून सुद्धा आपल्याला इन्कम मिळवता येणार आहे. जसे की, तुम्ही भीम अॅप दुस-यांना वापरण्यास सांगितले की, 10 रुपयांचा फायदा होतो. त्याचप्रमाणे गुगलच्या ‘तेज’ अॅपमधून तुम्हाला फायदा करता येणार आहे. एका मित्राला तुम्ही जर ‘तेज’ अॅप वापरायला सांगितले की तुम्हाला 51 रुपये मिळणार आहेत. यासाठी गुगलने नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये जर तुमच्या सल्ल्यानुसार महिन्याला अधिकाअधिक 50 मित्रांनी तेज अॅपचा वापर केला, तर तुम्ही 2550 रुपये मिळवू शकता.  

काय आहे ‘तेज’ अॅप?
- यूपीआयद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते तेज अॅपशी जोडल्यानंतर तुम्ही अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुस-या बँकेत रक्कम ट्रान्सफर करु शकता. 
- या अॅपमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गुगलच्या विविध स्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे हे अॅप वापरण्यास सुरक्षित असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे. 
- तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही तात्काळ एखाद्याला पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्विकारु शकता. त्यासाठी तुम्हाला फोन किंवा बँक अकाऊंटचा नंबर अशी खासगी माहिती शेअर करण्याची गरज नाही. 
- तेज अॅपवर इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, मराठी, तामिळ आणि तेलगु भाषा उपलब्ध असतील. 
- तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही जागीच चहावाल, दूधवाला, सलूनवाला यांना डिजिटल पेमेंट करु शकता. 
- या अॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे. 

बक्षीस जिंकण्याची संधी... 
-अॅपमध्ये तेज स्क्रॅच कार्ड असेल. योग्य व्यवहारासाठी ग्राहकाला 1 हजार रुपयापर्यंत रक्कम जिंकता येईल. 
- तेज लकी रविवारी स्पर्धेत ग्राहकाला दर आठवडयाला 1 लाखापर्यंत रक्कम जिंकता येईल.
- 50 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार करणारेच तेज अॅप स्पर्धेसाठी पात्र असतील. 

Web Title: Earn more than 2500 rupees from Google's fast app, do so.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल