Chat GPT मधून दरमहा लाखोंची कमाई! घरबसल्या होईल दुप्पट उत्पन्न, पाहा डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:02 IST2023-01-25T14:01:55+5:302023-01-25T14:02:32+5:30
चॅट GPT ला सर्च इंजिनचे अपग्रेड व्हर्जन म्हणून बाजारात आणले असून, याला अनेकजण Google चा पर्याय म्हणूनही पाहत आहेत.

Chat GPT मधून दरमहा लाखोंची कमाई! घरबसल्या होईल दुप्पट उत्पन्न, पाहा डिटेल्स...
Online Earning: चॅट GPT ला सर्च इंजिनचे अपग्रेड व्हर्जन म्हणून बाजारात आणले असून, याद्वारे लोकांना जलद गतीने माहिती मिळू शकते. चॅट जीपीटी चांगलंच लोकप्रिय झालं असून, हे Google लाही मागे टाकेल असे म्हटले जात आहे. चॅट जीपीटी गूगलपेक्षाही चांगले सर्च इंजिन म्हणून काम करेल असे काहींचे मत आहे. चॅट जीपीटीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकप्रियतेमागे एक मोठे कारण आहे, त्यातून मिळणारे उत्पन्न होय.
व्हिडिओ बनवण्यासाठी वापर
चॅट GPT चा वापर कंटेंट जनरेट करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु लोकांनी त्यातून कमाई करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जेव्हा कंटेट क्रिएटर्सना YouTube साठी व्हिडिओ बनवायचा असतो, तेव्हा त्यांना प्रथम कंटेट तयार करावी लागतो, नंतर तो कंटेट व्यवस्थित चेक करावा लागतो, नंतर एका लयबद्ध पद्धतीने मांडावा लोगतो आणि नंतर YouTube वर टाकला जातो. अशा प्रकारे YouTube व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो, परंतु चॅट GPT आल्यानंतर हा वेळ कमी झाला आहे.
लोक आता कंटेट तयार करण्यासाठी चॅट GPT वापरत आहेत. नंतर काही AI सॉफ्टवेअर व्हॉइस किंवा अँकरींग करतात आणि हा कंटेट क्रिएट होतो. अशा परिस्थितीत, काही मिनिटांच्या मेहनतीनंतर एक उत्कृष्ट व्हिडिओ तयार केला जातो. या चॅट जीपीटीमध्ये कंटेट क्रिएटर्सना अनेक गोष्टी मिळत आहेत. तसेच, यातून YouTube वर सक्रिय असणारे लोक दरमहा लाखोंची कमाई करत आहेत.