कमी किंमतीत येणाऱ्या Tecno Phones वर मिळतोय दिवाळीचा जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

By सिद्धेश जाधव | Published: November 2, 2021 06:38 PM2021-11-02T18:38:11+5:302021-11-02T18:39:27+5:30

Diwali Discount on budget phone of Tecno: बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करण्यासाठी Tecno ओळखली जाते. सेलमध्ये Spark 7T, Tecno Spark 7, Spark Go, Camon 7, Pova 2 आणि इतर टेक्नो फोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे.  

Diwali Discount on budget phone of Tecno check out the deals  | कमी किंमतीत येणाऱ्या Tecno Phones वर मिळतोय दिवाळीचा जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

कमी किंमतीत येणाऱ्या Tecno Phones वर मिळतोय दिवाळीचा जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

Next

स्मार्टफोन कंपनी Tecno ने आपल्या फोन्सवर दिवाळी डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी आपले बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखली जाते. त्यात आता दिवाळी डिस्काउंटमुळे हे फोन्स परडवणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील. या ऑफरमध्ये Spark 7T, Spark 7, Spark Go, Camon 7, Pova 2 आणि इतर अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या डील्समध्ये बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि कुपन्सचा समावेश आहे. तसेच RuPay, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळेल.  

सर्व बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या टेक्नो फोन्सवर कंपनीने डिस्काउंटची घोषणा केली आहे. या डील्सचा फायदा Amazon वरून केलेल्या खरेदीवर देखील मिळेल. चला जाणून घेऊया कंपनीने सादर केलेली ऑफर नेमकी काय आहे:   

Tecno Spark 7T चा 4GB/64GB व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता. परंतु ऑफर अंतर्गत हा फोन 8,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर RuPay, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल.  

Tecno Spark 7 अ‍ॅमेझॉनवर 200 रुपयांच्या डिस्काउंट कुपननंतर 7499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनची मूळ किंमत 8,999 रुपये आहे. RuPay, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डवर आणि ईएमआयवर 10 टक्के डिस्काउंट मिळेल.  

TECNO SPARK GO 2021 चा 2GB/32GB मॉडेल 8,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता. या ऑफर अंतर्गत हा फोन 6999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, यासाठी 300 रुपयांच्या कुपनचा देखील वापर करावा लागेल. या फोनवर देखील RuPay, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येईल.  

Tecno Camon 17 अ‍ॅमेझॉनच्या दिवाळी सेलमध्ये 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 15,999 रुपये होती. त्याचबरोबर RuPay, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्ड धारकांना 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळेल.  

Web Title: Diwali Discount on budget phone of Tecno check out the deals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.