सावधान! न्यू ईयर मेसेज करू शकतो कंगाल? एक क्लिक अन् अकाउंट होईल रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:01 IST2024-12-31T17:00:18+5:302024-12-31T17:01:01+5:30
नववर्षाच्या शुभेच्छांद्वारे लोकांना टार्गेट करण्याची तयारी करण्यात आली आहे. मेसेज ओपन करताच तुमचं अकाउंट रिकामं होईल.

सावधान! न्यू ईयर मेसेज करू शकतो कंगाल? एक क्लिक अन् अकाउंट होईल रिकामं
सध्या देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर ठग काही अंतरावर बसून तुमच्या अकाऊंटवर डल्ला मारतात. जेव्हा तुम्हाला याबाबत समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पोलिसांनी लोकांना याबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या शुभेच्छांद्वारे लोकांना टार्गेट करण्याची तयारी करण्यात आली आहे. मेसेज ओपन करताच तुमचं अकाउंट रिकामं होईल.
पोलिसांनी लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे, अन्यथा तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं. एपीके फाइल्स आणि ॲप्स तयार करणाऱ्या व्हिएतनामच्या वेबसाइट डेव्हलपर्सपर्यंत आता सायबर ठगची पोहोच असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याच्या मदतीने लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेज पाठवले जात आहेत.
सायबर ठग व्हिएतनाममधून असे ॲप्स आणि फाइल्स डेव्हलप करत आहेत. हे करण्यासाठी केवळ दहा हजार रुपये खर्च होत असून या माध्यमातून फसवणूक करणारे लोकांचं अकाऊंट रिकामं करत आहेत. जेव्हा सायबर ठग तुम्हाला एपीके फाइलद्वारे मेसेज पाठवेल आणि ॲप डाउनलोड करण्याची लिंक मोबाइलवर दिसेल. त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही फसवणूक करणाऱ्यांच्या रडारवर याल. येथे तुम्ही मेसेज वाचत असाल आणि दुसरीकडे सायबर ठग तुमचं अकाउंट रिकामं करतील.
सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला मेसेज आला तर ते इन्स्टॉल करू नका आणि जर ते चुकून इन्स्टॉल झालं तर ते ताबडतोब अनइन्स्टॉल करा किंवा मोबाइल ताबडतोब बंद करा. एवढेच नाही तर तुम्ही तुमचा मोबाईल डेटा बंद करूनही हे टाळू शकता. याबाबत माहिती देताना एडीसीपी क्राइम अँड सायबर सेल मनीष सोनकर म्हणाले की, नववर्षात असे मेसेज येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा आणि योग्य ती काळजी घ्या.