शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 10:29 IST

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले होते.

नवी दिल्ली - देशावर सध्या कोरोनाचं संकट आहे. जगभरात कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. यामध्ये STAY HOME SAVE LIVES म्हणजेच घरात राहा आणि आपले आयुष्य वाचवा असा खास संदेश देत महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या होत्या. त्यानंतर आज गुगलने कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला डुडलच्या माध्यमातून सलाम केला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वत: ला झोकून दिलं आहे. कोरोनाशी सामना करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचे गुगलने आभार मानले आहेत. त्यांना Thank you म्हणणारे खास डुडल तयार केले आहे. नेटिझन्सनेही या खास डुडलचं कौतुक केलं आहे.

गुगलच्या या खास डूडलमध्ये वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा इमोजी दिसत आहे. या संकटाशी सामना करणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोजी वापरण्यात आला आहे. तसेच डुडलवर क्लिक केल्यावर Thank you doctors, nurses and all healthcare workers असा एक व्हिडीओ ओपन होतो. यामध्ये डॉक्टर रुग्णांना सल्ला देताना दिसत आहेत. गुगलचे हे अ‍ॅनिमेटेड डुडल असून यामध्ये गुगलमधील O लेटरवर हार्ट इमोजी आहे तर E लेटर डॉक्टर, नर्स यांना चिन्हांमध्ये दाखवण्यासाठी वापरण्यात आलं आहे. 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले होते. STAY HOME SAVE LIVES म्हणजेच घरात राहा आणि आपले आयुष्य वाचवा असा खास संदेश देत महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या. डुडलमधील प्रत्येक अक्षर हे लोकांना घरात राहण्याच्या सूचना देत होतं. यामध्ये पुस्तक वाचणे, गिटार वाजवणे, व्यायाम करणे, मित्रांशी फोनवरून बोलणे याचा यात गोष्टींचा समावेश होता. गुगल डुडलवर क्लिक केल्यानंतर कोरोना व्हायरस टीप्सच्या पेजवर जाता येतं होतं. यामध्ये लोकांना काही सूचना करण्यात आल्या असून टीप्सचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 361वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 71 रुग्ण

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगलDoodleडूडलtechnologyतंत्रज्ञानdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल