Coronavirus Google Doodle shares tips to prevent spread of corona SSS | Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. मात्र सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. जगभरात कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले आहेत. STAY HOME SAVE LIVES म्हणजेच घरात राहा आणि आपले आयुष्य वाचवा असा खास संदेश देत महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या आहेत. डुडलमधील प्रत्येक अक्षर हे लोकांना घरात राहण्याच्या सूचना देत आहे. यामध्ये पुस्तक वाचणे, गिटार वाजवणे, व्यायाम करणे, मित्रांशी फोनवरून बोलणे याचा यात गोष्टींचा समावेश आहे. गुगल डुडलवर क्लिक केल्यानंतर कोरोना व्हायरस टीप्सच्या पेजवर जाता येतं. यामध्ये लोकांना काही सूचना करण्यात आल्या असून टीप्सचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अशी करा मदत

- घरात राहा.

- अंतर राखा.

- हात स्वच्छ धुवा.

- खोकताना नेहमी तोंडवर रुमाल ठेवा.

- तब्येत बिघडल्यास हेल्पलाईनशी संपर्क साधा.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे.

गुगल डुडलने पेजवर कोरोनापासून वाचण्यासाठी दिल्या खास टिप्स  

- आपले हात नेहमी स्वच्छ धुवा. तसेच सॅनिटायझर हाताला लावा.

- खोकताना किंवा शिंकताना नाकावर रुमाल धरा. हात नेहमी तोंडाला लावू नका.

- रुग्णापासून एक मीटरच्या अंतराने राहा.

- एकांतात राहा.

- हात स्वच्छ नसेल तर तोंडाला, नाकाला, डोळ्याला स्पर्श करू नका.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठं यश; व्हायरसला हरवण्यासाठी तयार केली लस!

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

Web Title: Coronavirus Google Doodle shares tips to prevent spread of corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.