Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 07:46 AM2020-04-13T07:46:27+5:302020-04-13T07:58:31+5:30

Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 11,853,155 over 114,247 died SSS | Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

Next

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 114,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,853,155 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 423,554 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 22,115 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 560,433 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 156,363 वर गेली आहे. तर तब्बल 19,899 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 17,209 वर गेली आहे. कोरोनामुळे  चीनमध्ये 3,341, स्पेनमध्ये 17,209, इराणमध्ये 4,474 , फ्रान्समध्ये 14,393, जर्मनीमध्ये 3,022 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी अटकाव घातला गेला असून तिथे 24 तासांत केवळ दोन बळी गेले आहेत. मात्र तेथील मृतांची संख्या 3 हजार 350 च्या जवळ पोहोचली आहे. इराणमध्येही कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीतून दिसते. अर्थात तिथेही मृत्यूंचा आकडा जवळपास 5 हजारांजवळ गेली आहे. म्हणजेच जगात आतापर्यंत झालेल्या मृत्युंपैकी सुमारे 80 हजार मृत्यू याच सात देशांमध्ये झाले आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

भारतात रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण 20 टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या 1 हजार 671 आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण 716 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या 1671 आहे.


महत्त्वाच्या बातम्या

भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे
 

Web Title: coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 11,853,155 over 114,247 died SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.