चीनमध्ये iPhone वर बहिष्कार, Huawei वर मोठी सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 09:41 PM2018-12-25T21:41:24+5:302018-12-25T21:42:20+5:30

अमेरिकेत हुआवे कंपनीला संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता चीनमधील इतर कंपन्यांनी हुआवेला दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे डिव्हाईसेस खरेदी करण्यासाठी मोठी सूट दिली आहे.

Chinese firms ask workers to shun iPhones, buy Huawei devices | चीनमध्ये iPhone वर बहिष्कार, Huawei वर मोठी सूट 

चीनमध्ये iPhone वर बहिष्कार, Huawei वर मोठी सूट 

नवी दिल्ली : अमेरिकेत हुआवे कंपनीला संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता चीनमधील इतर कंपन्यांनी हुआवेला दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे डिव्हाईसेस खरेदी करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. तसेच, आयफोन खरेदी करण्यास मनाई करत आहेत.

निक्केई एशियन रिव्ह्यूच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील प्रोसेक्यूटर्सच्या सांगण्यानुसार हुआवे कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी मेंग वांझोऊ यांना कॅनडामध्ये अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचबरोबर, काही चीनच्या व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, हुआवे कंपनीच्या मदतीसाठी हुआवेचे स्मार्टफोन खरेदी करा. या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येईल. 

याशिवाय, 20 हून अधिक चीनच्या कंपन्यांनी सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, हुआवे कंपनी इतर प्रॉडक्ट्सच्या विक्रीत सुद्धा वाढ करणार आहे. तसेच, काही चीनच्या कंपन्यांनी अॅपल कंपनीच्या प्रॉडक्टवर बहिष्कार घातला आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी चीनच्या एका न्यायालयाने क्वालकॉमच्या बाजूने निर्णय देत चीनमधील आयफोनचे प्रॉडक्ट्स आयात आणि विक्रीवर बंदी घातली आहे. यावेळी अॅपल कंपनीने आपल्या दोन पेटेंटचे उल्लंघन केल्याचा दावा क्वालकॉमकडून करण्यात आला होता.

Web Title: Chinese firms ask workers to shun iPhones, buy Huawei devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.