ChatGPT Studio Ghibli: चॅटजीपीटीच्या नवीन घिब्ली इमेज जनरेटरने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया सध्या स्टुडिओ घिब्ली (Studio Ghibli) इमेजने भरलं आहे.चॅटजीपीटीच्या या फिचरने येताच लोकांना वेड लावले. यूजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल फोटो म्हणून घिब्ली स्टाईल एआय फोटो ठेवला. त्यानंतर चॅटजीपीटी युजर्सनी हा नवीन ट्रेंड स्वीकारला आणि घिब्ली फॉरमॅटमध्ये त्यांचे काल्पनिक जग तयार करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर सध्या घिब्ली इमेजेसने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. ओपन एआय चॅटजीपीटीचे '४० इमेज जनरेशन' हे फिचर आल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांकडून घिब्ली इमेजेस तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. या आकर्षक आणि अॅनिमेटेड इमेजेसची भुरळ जगभरातल्या लोकांना पडली आहे. यामध्ये भारतीय राजकारणी देखील मागे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घिब्ली इमेज (Ghibli Image) त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घिब्ली इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
हा नवीन ट्रेंड OpenAI च्या GPT-4o मॉडेलच्या मदतीने शक्य झाला आहे. या नवीन इन-बिल्ट इमेज जनरेशन टूलद्वारे, युजर्स स्टिकर्स, साइनबोर्ड, मीम्स आणि अगदी फोटोरिअलिस्टिक इमेज देखील तयार करू शकतात. हे फिचक लाँच करताना ओपन एआयने, "हे मल्टीमोडल मॉडेल उपयुक्त आणि मौल्यवान इमेज निर्मिती अनलॉक करते, हे अचूक, वास्तववादी आणि फोटोरिअलिस्टिक आउटपुट देण्यास सक्षम आहे," असं सांगितलं आहे.
स्टुडिओ घिब्ली काय आहे?
स्टुडिओ घिब्ली (Studio Ghibli) हा जपानमधील प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे, ज्याची स्थापना दिग्गज ॲनिमेशन दिग्दर्शक हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी १९८५ मध्ये केली होती. हा स्टुडिओ त्याच्या सुंदर कला, सखोल कथाकथन आणि निसर्ग, मानवता, कल्पनाशक्ती यासारख्या थीमसाठी ओळखला जातो.
घिब्ली इमेज कशी तयार करायची?
या नवीन एआय टूलद्वारे घिब्ली इमेज तयार करणे हे अतिशय सोपे आहे...
-हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅटजीपीटीमधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जावे लागेल.
-त्यानंतर चॅटजीपीटीमध्ये Can you turn this into a Ghibli style photo?', 'Show me in Studio Ghibli style.', 'How would Ghibli sketch my features?' असे प्रॉम्प्ट वापरू शकता
-तुम्हाला घिब्ली-स्टाईलमध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा
-GPT-4o मॉडेलला Make a Studio Ghibli version of this image असं प्रॉम्प्ट द्या
-तुमची घिब्ली-स्टाईल इमेज तयार होईल
-आता तो फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि या ट्रेंडचा भाग व्हा.