तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:02 IST2025-12-29T14:01:41+5:302025-12-29T14:02:48+5:30
Change Gmail Address Marathi: आतापर्यंत मूळ @gmail.com ने संपणारे पत्ते बदलणे कठीण मानले जात होते. मात्र, गुगल आता अशा फिचरवर काम करत आहे...

तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
आजच्या काळात आपला ईमेल आयडी ही आपली डिजिटल ओळख बनली आहे. अनेकदा आपण शाळेत असताना किंवा गंमत म्हणून एखादा 'कुल' वाटणारा ईमेल आयडी तयार करतो (उदा. smartboy123@gmail.com), पण नोकरी किंवा व्यवसायात तो वापरताना संकोच वाटतो. अशा वेळी "Gmail आयडी बदलता येतो का?" हा प्रश्न अनेकांना पडतो. गुगलने आता या प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे बदल आणि नियम स्पष्ट केले आहेत.
आतापर्यंत मूळ @gmail.com ने संपणारे पत्ते बदलणे कठीण मानले जात होते. मात्र, गुगल आता अशा फिचरवर काम करत आहे ज्यामुळे युजर्स आपला प्राथमिक ईमेल पत्ता बदलू शकतील.
जीमेल आयडी बदलण्यासाठीच्या ३ महत्त्वाच्या अटी:
१२ महिन्यांचा नियम: तुम्ही वर्षातून (१२ महिने) फक्त एकदाच आपला ईमेल आयडी बदलू शकता. एकदा बदलल्यानंतर तो वर्षभर पुन्हा बदलता येणार नाही.
मर्यादित वेळा बदल: एका गुगल खात्याचा अॅड्रेस तुम्ही आयुष्यात जास्तीत जास्त ४ वेळा बदलू शकता.
जुना आयडी सुरक्षित: तुम्ही नवा आयडी निवडला तरी जुना आयडी 'Alias' (दुय्यम पत्ता) म्हणून काम करत राहील. म्हणजेच जुन्या पत्त्यावर येणारे मेल्स तुमच्या नवीन इनबॉक्समध्ये आपोआप येतील.
काय करावे लागेल...
तुमच्या कॉम्प्युटरवर myaccount.google.com वर जा. तिथे डाव्या बाजूला असलेल्या 'Personal info' (वैयक्तिक माहिती) टॅबवर क्लिक करा. यानंतर खाली स्क्रोल करून 'Email' पर्यायावर टॅप करा. येथे 'Google Account email' वर क्लिक करा. जर तुम्हाला येथे 'Edit' किंवा पेन्सिलचे आयकॉन दिसत असेल, तर तुम्ही तुमचा आयडी बदलू शकता.