सोने, हिरेजडीत iPhone 11 Pro लाँच; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:28 PM2019-10-10T13:28:23+5:302019-10-10T13:32:41+5:30

आयफोन डिझाईन करणारी रशियाची कंपनी caviar ने अ‍ॅपलच्या लेटेस्ट आयफोन सीरिजमधील iPhone 11 Pro चं एक नवं डिझाईन लाँच केलं आहे.

caviar customizes iphone 11 pro with gold and diamond removes square camera setup | सोने, हिरेजडीत iPhone 11 Pro लाँच; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

सोने, हिरेजडीत iPhone 11 Pro लाँच; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

Next
ठळक मुद्देcaviar ने अ‍ॅपलच्या लेटेस्ट आयफोन सीरिजमधील iPhone 11 Pro चं एक नवं डिझाईन लाँच केलं आहे.iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या दोन्ही लिमिटेड एडिशनचे वेगवेगळे हॅण्ड-क्राफ्टेड डिजाईन उपलब्ध आहेत. अ‍ॅडिशनल स्क्रीन प्रोटेक्शनसोबत या डिव्हाईसची किंमत 4,000 डॉलर म्हणजेच जवळपास 2,84,000 रुपयांपासून सुरू होणार आहे.

नवी दिल्ली - अ‍ॅपल आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या तीन फोन्सचा समावेश आहे. त्यानंतर आता आयफोन डिझाईन करणारी रशियाची कंपनी caviar ने अ‍ॅपलच्या लेटेस्ट आयफोन सीरिजमधील iPhone 11 Pro चं एक नवं डिझाईन लाँच केलं आहे. विक्ट्री असं नाव ठेवण्यात आलं असून विशेष म्हणजे हा सोनं आणि हिरेजडीत असणार आहे. 

iPhone 11 Pro च्या बॅक पॅनलवर ‘V’ लेटर कोरण्यात आले आहे. ते रिअर पॅनलला दोन भागांमध्ये विभागतो. कंपनीचं हे लिमिटेड एडिशन असणार आहे. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या दोन्ही लिमिटेड एडिशनचे वेगवेगळे हॅण्ड-क्राफ्टेड डिजाईन उपलब्ध आहेत. मात्र कॅमेरा लेन्सच्या बाजूला चौकोर पॅनल असणार नाही. तसेच caviar ने नवीन आयफोन डिजाईनला शॉक-प्रुफ बॉडीला मजबूत मेटल फ्रेमने कव्हर करण्यात आलं आहे.

अ‍ॅडिशनल स्क्रीन प्रोटेक्शनसोबत या डिव्हाईसची किंमत 4,000 डॉलर म्हणजेच जवळपास 2,84,000 रुपयांपासून सुरू होणार आहे. विक्ट्री टायटेनिअम यापैकी सर्वात स्वस्त व्हेरिएंट आहे. 64 जीबी स्टोरेज असलेल्या आयफोनची किंमत 4,290 डॉलर म्हणजेच जवळपास 3,40,000 रुपये इतकी आहे. स्टोरेज आणि आणखी चांगल्या व्हेरिएंटसाठी ही जास्त किंमत मोजावी लागणार आहे. कंपनीच्या ग्लोबल वेबसाईटवरून याची खरेदी करता येणार आहे. 

बॅक पॅनलवर ब्लॅक एलिगेटर लेदर फिनीश असून याची किंमत 12,000 डॉलर म्हणजेच जवळपास 8,50,000 रुपये आहे आणि सोन्याच्या डिजाईनची किंमत तब्बल 30,820 डॉलर म्हणजेच जवळपास 21,88,000 रुपये आहे. तर हिरेजडीत iPhone 11 Pro ची किंमत सोन्याच्या आयफोनच्या दुप्पट आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलच्या आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये तीन फोन्सचा समावेश आहे. आयफोन 11 सीरिजमधील फोन्सची किंमत 699 डॉलरपासून सुरू आहे. या नव्या फोन्समध्ये A13 बायोनिक चिपसेट आहे. iPhone 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपयांपासून सुरू आहे. यामध्ये 64 जीबी मेमरी, 128 जीबी आणि 256 जीबी वेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. iPhone Pro भारतात 99,900 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरू आहे. iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max च्या या किमती 64 जीबी वेरिएंटच्या आहेत. याशिवाय हे दोन्ही फोन्स 256 जीबी आणि 512 जीबी मेमरी सुविधेसह उपलब्ध आहेत.  

 

Web Title: caviar customizes iphone 11 pro with gold and diamond removes square camera setup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.