शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

बाइटडान्सनं धुडकावला अमेरिकेचा प्रस्ताव, टिकटॉकची भागीदारी मायक्रोसॉफ्टला विकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 9:41 AM

म्प यांनी अमेरिकन लोकांना टिकटॉकबरोबर व्यवसाय करणे थांबवण्याची मुदत दिली आहे. जेणेकरून टिकटॉक आपली मालकी अमेरिकन कंपनीला विकेल.

चिनी कंपनी बाइटडान्स मायक्रोसॉफ्टला टिकटॉकच्या मोबाइल अ‍ॅपच्या मालकी हक्कांची विक्री करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. बाइटडान्सने टिकटॉक खरेदी करण्याची ऑफर नाकारली आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत ऑपरेट करण्यासाठी चिनी मालकीची कंपनी विकण्याची किंवा बंद करण्याची अंतिम मुदत लवकरच संपुष्टात येणार आहे. वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात राजनैतिक वादाचे केंद्रबिंदू टिकटॉक झाले आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांना टिकटॉकबरोबर व्यवसाय करणे थांबवण्याची मुदत दिली आहे. जेणेकरून टिकटॉक आपली मालकी अमेरिकन कंपनीला विकेल.डोनाल्ड ट्रम्प यांचा असा दावा आहे की, टिकटॉकचा उपयोग फेडरल कर्मचार्‍यांची लोकेशन शोधणे, ब्लॅकमेलसाठी लोकांवर डोजियर आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा मागोवा घेण्यासाठी चीन करू शकतो. बाइटडान्स या कंपनीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉक चालविण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत हिस्सा विकण्यासाठी वेळ दिला आहे.

टिकटॉकच्या मालकीचा संदर्भ देताना मायक्रोसॉफ्टने निवेदनात म्हटले आहे की, बाइटडान्सने  टिकटॉकचा हिस्सा अमेरिकेच्या ऑपरेशन मायक्रोसॉफ्टला विकणार नकार दिला आहे. "आमचा विश्वास आहे की राष्ट्रीय सुरक्षा हितसंबंधांचे संरक्षण करताना आमचा प्रस्ताव टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी चांगला असेल." ट्रम्प यांच्या आदेशानंतर मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल हे टिकटॉकची मालकी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, जर टिकटॉकची मालकी आम्हाला मिळाली असती तर सुरक्षितता, गोपनीयता, ऑनलाइन सुरक्षा आणि खंडणी या सर्वोच्च दर्जाची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले असते.

अमेरिकेच्या या कारवाईला आव्हान देत टिकटॉकने दावा दाखल केला आहे की, ट्रम्प यांचे आदेश म्हणजे 'आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अधिनियमा'चे गैरवापर आहे, कारण  या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशाला कोणताही धोका नाही. अमेरिकेत टिकटॉक 17.5 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. टिकटॉकचा वापर जगभरात एक अब्ज लोक करतात. वापरकर्त्यांकडून चीनशी डेटा सामायिक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, परंतु कंपनी या गोष्टीला नकार देत आहे. 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक