Budget Smartwatch: फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron

By सिद्धेश जाधव | Updated: January 6, 2022 17:19 IST2022-01-06T17:18:52+5:302022-01-06T17:19:01+5:30

Budget Smartwatch: ऑलवेज AMOLED डिस्प्ले, SPO2 मॉनिटरिंग आणि अनेक हेल्थ सेंट्रिक फीचर्स Fire Boltt Ultron नावाचा स्मार्टवॉच लाँच झाला आहे.

Budget Smartwatch Fire boltt ultron smartwatch launched in india at price under rs 4000  | Budget Smartwatch: फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron

Budget Smartwatch: फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron

Fire Boltt नं भारतात नवीन Budget Smartwatch सादर केला आहे. कंपनीनं ऑलवेज अ‍ॅमोलेड डिस्प्ले, SPO2 मॉनिटरिंग आणि अनेक हेल्थ सेंट्रिक फीचर्स Fire Boltt Ultron नावाचा स्मार्टवॉच लाँच केला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 4,000 रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही हा स्मार्ट डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता.  

Fire Boltt Ultron चे स्पेसिफिकेशन्स 

फायर-बोल्ट अल्ट्रॉन मध्ये 1.2 इंचाचा वर्तुळाकार अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 390x390 पिक्सल रिजोल्यूशन असलेला ऑलवेज-ऑन-डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये तुम्हाला SpO2 मोनिटरिंग, ब्लड-प्रेशर मॉनिटरिंग आणि हार्ट रेट ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच वॉच मध्ये मेडिटेटिव्ह ब्रीदिंग आणि पीरियड रिमाइंडर देखील मिळतो.  

कंपनीनं यात स्लीप ट्रॅकिंग आणि 14 वर्कआउटचा समावेश केला आहे. याला घाम आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी 3ATM वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. यात वेदर अपडेट, कॅमेरा आणि म्यूजिक कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेशन, बिल्ट-इन गेम्स, ड्युअल युआय मेनू आणि कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.0 देखील देण्यात आलं आहे. अल्ट्रॉन स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Fire-Boltt Ultron ची किंमत 

फायर-बोल्ट अल्ट्रॉनची किंमत 10,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा स्मार्टवॉच 63% डिस्काउंटनंतर 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वॉचच्या खरेदीवर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. तुम्ही हा स्मार्टवॉच फक्त 139 रुपयांचा मासिक EMI देऊन देखील विकत घेऊ शकता.  

हे देखील वाचा:

तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो

16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार

Web Title: Budget Smartwatch Fire boltt ultron smartwatch launched in india at price under rs 4000