16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार  

By सिद्धेश जाधव | Published: January 5, 2022 07:36 PM2022-01-05T19:36:27+5:302022-01-05T19:37:07+5:30

Realme Book Enhanced Edition लॅपटॉप 16GB रॅम, 512GB स्टोरेज आणि 65W सुपर फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.  

Realme book enhanced edition launched with 16gb ram 512gb ssd storage and 65w super fast charging  | 16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार  

16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार  

Next

Realme Book Enhanced Edition Laptop चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप Realme GT 2 Series च्या लाँच इव्हेंटमधूनच जगासमोर ठेवण्यात आला आहे. रियलमीच्या या नवीन लॅपटॉपमध्ये 16GB रॅम, 256GB स्टोरेज आणि 65W सुपर फास्ट चार्जिंग, असे फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया नव्या Realme Book ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Realme Book Enhanced Edition Laptop चे स्पेसिफिकेशन्स  

हा लॅपटॉप मेटॅलिक बॉडी आणि स्लिक डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. नव्या रियलमी लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2160×1440 आणि अस्पेक्ट रेशियो 3:2 आहे. हा डिस्प्ले 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं यात प्रोसेसिंगसाठी i5-11320H 11th Gen प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत Intel Iris Xe Graphics G7 96EU जीपीयू देण्यात आला आहे.  

हा लॅपटॉप 16जीबी रॅम आणि 512जीबी SSD स्टोरेजसह विकत घेता येईल. तसेच यात Microsoft Window 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टूडेंट एडिशन प्री-इंस्टॉल मिळते. यातील 54Whr बॅटरी सिंगल चार्जमध्ये 11 तासांचा नाकूप देते. तसेच यात 65W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  

Realme Book Enhanced Edition Laptop ची किंमत  

Realme Book Enhanced Edition चा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये आला आहे. ज्याची किंमत 4,699 युआन म्हणजे सुमारे 55,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप स्काय ब्लू आणि आयलंड अ‍ॅश रंगात विकत घेता येईल. याच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

हे देखील वाचा:

Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM

Web Title: Realme book enhanced edition launched with 16gb ram 512gb ssd storage and 65w super fast charging 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.