शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

BSNL's Cashback Offer : बीएसएनएलची भन्नाट ऑफर; एक एसएमएस केला तरीही मिळणार कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:29 AM

BSNL's Cashback Offer : रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास 6 पैसे आकारणार असल्याची घोषणा करत रिचार्जची रक्कमही वाढविली होती.

नवी दिल्ली : एकीकडे प्राईस वॉर सोडून खासगी कंपन्या दरवाढीची स्पर्धा करू लागलेल्या असताना बीएसएनएलने कोणतीही दरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर आता एसएमएस केल्यावरही कॅशबॅक देण्याची भन्नाट ऑफरच सुरू केली आहे. 

कॉलिंग केल्यावर मिनिटाला 6 पैशांचा कॅशबॅक देण्याची योजना बीएसएनएलने गेल्या महिन्यात लाँच केली होती. आता ही योजना वाढविली असून यापुढे एसएमएस केल्यावरही सहा पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. यानुसार ग्राहकांनी एसएमएस पाठविल्याल त्याला 6 पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी ACT 6 paisa असा मॅसेज टाईप करून 9478053334 या नंबरवर पाठवावा लागणार आहे. 

ही ऑफर ऑफर BSNL वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास 6 पैसे आकारणार असल्याची घोषणा करत रिचार्जची रक्कमही वाढविली होती. यामुळे बीएसएनएलने या उलट ऑफर देत कॉल केल्यास ६ पैशांचा कॅशबॅक ग्राहकांना देऊ केला होता. 

ग्रामीण भागांत होणार फायदाजिओच्या योजनेमुळे नाराज झालेले ग्राहक आपल्याकडे आणण्यासाठी बीएसएनएलने ही योजना आणल्याचे बोलले जात आहे. सध्या देशाच्या ग्रामीण भागांत बीएसएनएल कंपनीचेच अधिक ग्राहक आहेत. त्यांना या घोषणेचा निश्चितच फायदा होईल.

३० सेकंद वाजणार रिंगमोबाइल सेवा देणाºया कंपन्यांमध्ये वाद सुरु असतानाच ट्रायने १ नोव्हेंबरपासून कॉल रिंग किती काळ वाजेल हे निश्चित केले. मोबाइलवरून मोबाइलवर कॉलची रिंग ३० सेकंद वाजेल. मोबाइवरून लँडलाइनवर कॉलची रिंग ६० सेकंद वाजणार आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओ