BSNL ची वेगाने वाटचाल; आतापर्यंत बसवले 93 हजार 4G टॉवर्स, लवकरच 5G ची चाचणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:19 IST2025-05-27T17:18:12+5:302025-05-27T17:19:17+5:30
नेटवर्क समस्येचा सामना करणाऱ्या BSNLच्या कोट्यवधी ग्राहकांना लवकरच चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.

BSNL ची वेगाने वाटचाल; आतापर्यंत बसवले 93 हजार 4G टॉवर्स, लवकरच 5G ची चाचणी...
BSNL Network: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नेटवर्कमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. कंपनीने आपली कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर्स बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी 93,450 टॉवर्सची उभारणी झाली असून, ते सुरू करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली इंडिया मोबाईल काँग्रेसच्या थीम लॉन्चप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, कंपनी पुढील महिन्यापासून 5G सेवेची चाचणी देखील सुरू करू शकते.
नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे उद्दिष्ट
खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो युजर्स BSNL नेटवर्कवर आले होते. पण, खराब कनेक्टिव्हिटीमुळे कंपनीच्या युजर्समध्ये सतत घट होत आहे. आता यासाठी कंपनीने आपल्या वेगाने आपल्या टॉवर्सची संख्या वाढवणे सुरू केले आहे. सोमवारी(26 मे) नवी दिल्ली येथे आयोजित आयएमसी 2025 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, 'आपण आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही 93,450 टॉवर्स बसवण्याचे काम पूर्ण केले आहे, परंतु आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.'
Delhi: Union Minister Jyotiraditya Scindia says, "BSNL has posted, for the first time in 18 years, back-to-back quarterly profits, net profits, not operating profit alone, not EBITDA, positive marginal loan, but net profit on a quarterly basis for the second time running after… pic.twitter.com/w6vJhVl27Y
— IANS (@ians_india) May 27, 2025
यावर्षी इंडिया मोबाईल काँग्रेस 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी स्वावलंबी भारत योजनेअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे नवीन मोबाइल टॉवर बसवत आहे. केंद्रीय एजन्सी सी-डॉट, तेजस नेटवर्क, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) आणि केंद्र सरकारने यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेल्या 22 महिन्यांपासून हे चारही भागधारक बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एकत्र काम करत असल्याची माहितीही सिंधिया यांनी दिली.