ग्राहकांची जोरदार मागणी; BSNL ने पुन्हा आणला आपला 1 रुपयांचा लोकप्रिय फ्रीडम प्लान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:22 IST2025-12-01T19:22:37+5:302025-12-01T19:22:52+5:30
BSNL Freedom Plan : फक्त 1 रुपयांत दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्...

ग्राहकांची जोरदार मागणी; BSNL ने पुन्हा आणला आपला 1 रुपयांचा लोकप्रिय फ्रीडम प्लान...
BSNL Freedom Plan : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ग्राहकांच्या जोरदार मागणीमुळे आपला लोकप्रिय 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन पुन्हा सुरू केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून याची घोषणा केली असून, ही ऑफर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध राहणार आहे.
1 रुपयात 30 दिवसांचा 'ट्रू डिजिटल फ्रीडम'
BSNL च्या या आकर्षक ऑफरअंतर्गत नव्या ग्राहकांना फक्त 1 रुपये रिचार्जमध्ये पुढील सुविधा मिळतात :
30 दिवसांची वैधता
दररोज 2GB हाय-स्पीड 4G डेटा
संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग सुविधा
नॅशनल रोमिंग फ्री
दररोज 100 फ्री SMS
Back by public demand - BSNL’s ₹1 Freedom Plan!
— BSNL India (@BSNLCorporate) December 1, 2025
Get, a Free SIM with 2GB data/day, unlimited calls and 100 SMS/day for 30 days of validity.
Applicable for new users only! #BSNL#AffordablePlans#BSNLPlans#BSNLFreedomPlanpic.twitter.com/pgGuNeU8c2
ही योजना फक्त नवीन BSNL ग्राहकांसाठीच आहे. आधीपासून असलेल्या यूजर्सना या 1 रुपयाच्या ऑफरचा लाभ मिळणार नाही. इच्छुक ग्राहक 1 रुपयांत नवीन BSNL सिम खरेदी करुन प्लॅन सक्रिय करू शकतात.
फ्रीडम प्लॅनची पहिली घोषणा
बीएसएनएलने याची पहिली घोषणा 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत केली होती. त्या वेळीही नव्या यूजर्सना 1 रुपयात सिम आणि 30 दिवसांची हीच डेटा व कॉलिंग सुविधा दिली जात होती.
फ्रीडम प्लॅनची वैधता 15 दिवसांनी वाढवली होती
पहिल्या फेरीत या ऑफरची वैधता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत होती. मात्र बीएसएनएलने नंतर ती 15 दिवसांनी वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली होती.
BSNL चा Learner’s Plan
विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बीएसएनएलने Learner’s Plan नावाचा विशेष प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये :
251 रुपयांत 28 दिवसांसाठी 100GB डेटा
अनलिमिटेड कॉलिंग
दररोज 100 SMS
ऑफरची वैधता : 13 डिसेंबर 2025 पर्यंत