अर्ध्या किंमतीत विकत घ्या 43-इंचाचा धमाकेदार Smart TV; शानदार 4K डिस्प्लेसह 50W चे स्पीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 12:38 IST2022-02-04T12:38:21+5:302022-02-04T12:38:31+5:30

Smart TV: Blaupunkt चा 43-इंचाचा Smart TV फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा सेल 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.  

Blaupunkt 43 Inch 4k Smart TV Available At Less Than Half The Market Price In Flipkart Big Bachat Dhamaal Sale 2022  | अर्ध्या किंमतीत विकत घ्या 43-इंचाचा धमाकेदार Smart TV; शानदार 4K डिस्प्लेसह 50W चे स्पीकर 

अर्ध्या किंमतीत विकत घ्या 43-इंचाचा धमाकेदार Smart TV; शानदार 4K डिस्प्लेसह 50W चे स्पीकर 

Flipkart वरील सेल्स तर सुरूच असतात. काल म्हणजे 3 फेब्रुवारीपासून Big Bachat Dhamaal सेल सुरु झाला आहे, जो 5 फेब्रुवारी पर्यंत चालेल. या सेलमध्ये Blaupunkt चा 43-इंचाचा शानदार Smart TV स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टकडून मोठा थेट डिस्काउंट तर मिळत आहे, परंतु बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस वापरून हा टीव्ही अर्ध्या पेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.  

Blaupunkt Cybersound 43 inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स  

या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे यात तुम्हाला गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन -बिल्ट मिळतो. जे तुम्हाला तुमच्या कंटेन्ट नेव्हिगेशन आणि स्मार्टफोनवरील कंटेन्ट बघण्यात मदत करतात. या स्मार्ट टीव्हीमधील अल्ट्रा एचडी (4K) डिस्प्ले 3,840 x 2,160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सोबत 50W चा साऊंड आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. 

किंमत आणि ऑफर्स  

या 4K स्मार्ट टीव्हीची किंमत 41,999 रुपये आहे. परंतु बिग बचत धमाल सेल अंतर्गत हा टीव्ही 30 टक्के सवलतीसह विकला जात आहे. त्यामुळे हा टीव्ही 28,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल त्यामुळे हा टीव्ही 27,549 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज करून तुम्ही 11,000 हजार रुपयांपर्यंची बचत करू शकता. म्हणजे हा टीव्ही फक्त 16,549 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल.  

हे देखील वाचा:

सर्वांची बोलती बंद करण्यासाठी येतोय स्वस्त 5G Smartphone; इतक्या किंमतीत मिळणार 6000mAh बॅटरी आणि 11GB RAM

Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

Web Title: Blaupunkt 43 Inch 4k Smart TV Available At Less Than Half The Market Price In Flipkart Big Bachat Dhamaal Sale 2022