Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:00 IST2025-10-18T18:58:29+5:302025-10-18T19:00:01+5:30
Amazon Diwali Sale: ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर 'दिवाळी धमाका सेल' सुरू आहे.

Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सुरू असलेल्या 'दिवाळी धमाका सेल'मध्ये ग्राहकांना नुकत्याच लाँच झालेल्या एका दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. शक्तिशाली ७०००mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटी असलेला रेडमी १५ 5G हा स्मार्टफोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा ३,००० रुपयांनी स्वस्त उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HyperOS वर चालतो, ज्यामुळे युजर्सना नवीनतम फीचर्स आणि स्मूथ इंटरफेसचा अनुभव मिळतो.
रेडमी हा फोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी, ८ जीबी रॅम + १२८ जीबी आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी अशा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला. या फोनची सुरुवाती किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. दिवाळी सेल दरम्यान, हा फोन १३ हजार ९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. इतर दोन व्हेरिएंट अनुक्रमे १४ हजार ९९९ आणि १५ हजार ९९९ मध्ये उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, रेडमी हा फोन ६७९ पासून सुरू होणाऱ्या ईएमआयसह खरेदी करता येईल. रेडमीच्या अधिकृत स्टोअर व्यतिरिक्त, तो अमेझॉनवरूनही खरेदी करता येईल. हा फोन सँडी पर्पल, फ्रॉस्ट व्हाइट आणि मिडनाईट ब्लॅक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
रेडमी १५ 5G: डिस्प्ले
रेडमीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी १५ 5G बाजारात सादर केला आहे. या फोनमध्ये दमदार फिचर्स असून तो किफायतशीर किंमतीत मिळणार आहे. मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी, नवीनतम प्रोसेसर आणि एआय क्षमतेसह हा फोन खास करून तरुण वर्गाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला. या फोनमध्ये ६.९ इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले मिळतो.
रेडमी १५ 5G: शक्तिशाली प्रोसेसर आणि स्टोरेज पर्याय
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 3 5G प्रोसेसर आहे, जो वेगवान आणि कार्यक्षम परफॉर्मन्स देतो. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजपर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो. याशिवाय, युजर्सला रॅम आणि स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही दिला आहे.
रेडमी १५ 5G: मोठी बॅटरी
रेडमीच्या या फोनमध्ये ७००० mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 33W USB Type-C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फोन दीर्घकाळ वापरता येतो आणि कमी वेळात चार्ज होतो.
रेडमी १५ 5G: कॅमेरा
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला.