शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार सिमकार्ड BLOCK! 'या' दोन राज्यात मोठी कारवाई, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:53 IST

Sim Card Block News: आर्थिक फसवणूक रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे

Sim Card Block News: सरकार बनावट सिमकार्डविरुद्ध सतत कारवाई करत असते. त्याच अनुषंगाने दूरसंचार विभागाने (DoT) गेल्या ९० दिवसांच्या कालावधीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुमारे ७१ हजार सिम कार्ड ब्लॉक केले आहेत. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. दूरसंचार विभाग अशा युजर्सवर सतत नजर ठेवून असते आणि त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. यामुळेच या सिमकार्डवर कारवाई करण्यात आली आहे आणि ती ब्लॉक करण्यात आली आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही सिम कार्ड फसवणूक करून मिळवली जातात. तसेच आर्थिक घोटाळ्यांमध्ये याचा वापर सर्रास केला जातो. त्याशिवाय, बनावट ओळखपत्रे देऊन ही सिम कार्ड घेतली जातात. त्यामुळे ही कारवाई आर्थिक घोट्याळ्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सिमकार्ड घेताना फसवणूक कशी केली जाते?

अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेगारांनी पॉइंट ऑफ सेल (पीओएस) एजंट्सचा गैरवापर केला आणि बेकायदेशीरपणे सिम कार्ड मिळवले. या गुन्हेगारांनी बनावट ओळखपत्रांचा वापर करून सिम कार्ड मिळवले आणि लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या मोठ्या कारवाईनंतर आता कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास संचार साथी पोर्टल, वेबसाइट किंवा हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे. जर फसवणूक झालेले लोक पुढे आले नाहीत, तर घोटाळेबाज त्यांची फसवणूक सुरूच ठेवतील. म्हणून अशा प्रकरणांची तक्रार करणे महत्वाचे आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बनावट सिमबाबत सरकारकडे कोणती यंत्रणा?

दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिम फसवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रोखण्यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यापैकी सर्वात प्रभावी म्हणजे: ASTR (AI आणि फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरणारे साधन) - हे साधन टेलिकॉम सिम सबस्क्राइबर पडताळणीसाठी वापरले जाते. वेगवेगळ्या पत्त्यांसह आणि नावांसह अनेक सिम कार्ड मिळवणाऱ्या व्यक्तींना ओळखण्यासाठी ASTR चा वापर केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत अनेक बनावट सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशfraudधोकेबाजी