Be! Now you can share whatsapp status on Facebook | व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर
व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

नवी दिल्ली: व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने जगभरात कोट्यावधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅप देखील सातत्याने नवनवीन फीचर आणून युजर्सला आर्कषित करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतं. आता देखील व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचरमध्ये व्हॅाट्सअ‍ॅपवर ठेवण्यात येणारे स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. 

व्हॅाट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमध्ये व्हॅाट्सअ‍ॅपवरील स्टेटस आता फेसबुकवर देखील शेअर करता येणार आहे. त्यामुळे या नवीन अपडेटमुळे व्हॅाट्सअ‍ॅप फेसबुकशी लिंक करता येणार आहे. तसेच व्हॅाट्सअ‍ॅप स्टेटस डिलिट करण्यात आल्यानंतर मात्र फेसबुकवर शेअर केलेले स्टेटस डिलिट होणार नसून फेसबुकवर कायम राहणार आहे.

व्हॅाट्सअपने सुरुवातील हे नवीन फीचर फक्त बीटी व्हर्जन युजरसाठी उपलब्ध करण्यात आले होते, मात्र आता सर्व फोनमध्ये हे नवीन फीचर वापरता येणार आहे. तसेच  व्हॉट्सअ‍ॅपवरून फेसबुकवर शेअर केलेल्या स्टेटसमध्ये केवळ फोटो किंवा पिक्चर टेक्स्टचं दिसू शकणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लिंक शेअर केल्यास फेसबुवर स्टोरीमध्ये दिसणार नाही. तसेच फोनमध्ये नवीन फीचर्स नसल्यास व्हॅाट्सअ‍ॅप अपडेट करणं आवश्यक असणार आहे.


Web Title: Be! Now you can share whatsapp status on Facebook
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.