शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

किबोर्डवर टाईप करताना जरा जपून! बटणांच्या आवाजावरून होतेय पासवर्डची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 1:18 PM

सावधान... तुमच्या कीबोर्डच करतोय हॅकर्सना मदत

Password leak with Keyboard Sound Technique: सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. एका क्लिकवर आपल्या साऱ्या गोष्टी झटपट होतात. पण डिजिटल युगासोबतच सध्या अनेक प्रकारचे इंटरनेट फ्रॉड म्हणजेच फसवणुकीच्या गोष्टीही घडत असतात. अशीच एक बाब आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही डिव्हाईसच्या कीबोर्डमधून निघणारा आवाज ऐकून त्याचा पासवर्ड चोरला जाऊ शकतो. हे केवळ Android वरच नाही तर आयफोन डिव्हाइसवर देखील केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत हा सुरक्षेचा मोठा धोका असल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

रिपोर्ट काय सांगतो?

ZDnet च्या रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर टाइप करता, तेव्हा तुमच्या कीबोर्डमधून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. या कीबोर्डमधून येणारा आवाज ऐकून हॅकर्स तुमचा पासवर्ड शोधू शकतात. यासाठी एक विशेष तंत्रज्ञान वापरले जाते असा दावाही करण्यात आला आहे.तंत्रज्ञान कसे कार्य करते?

या तंत्रज्ञानाला ध्वनिक साइड चॅनल टेक्नॉलॉजी म्हणतात. यामध्ये हॅकर्स टायपिंग करताना तुमच्या कीबोर्डमधून येणारा आवाज काळजीपूर्वक ऐकतात. मग हे आवाज अडव्हान्स डिव्हाईसवर रेकॉर्ड करतात. त्यानंतर त्यांचे बारकाईने परीक्षण करतात. हे डिव्हाईस टाइप केले जाणारे अचूक अक्षरे आणि संख्या शोधून देते. हे हॅकर्सना तुमच्या अकाऊंटमध्ये सहज प्रवेश मिळवून देते. या संशोधन कार्यात 16 इंच Apple MacBook Pro वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये AI च्या मदतीने कीबोर्डचा आवाज ऐकून मॅकबुकमध्ये काय टाईप केले जात आहे हे कळले. या संशोधनात त्याची अचूकता अंदाजे 95 टक्के होती. त्यामुळे आता यापासून युजर्सने आपला बचाव कसा करायचा, यावर अनेक तज्ञ्ज मंडळी विचार व संशोधन करत आहेत.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजीInternetइंटरनेटAndroidअँड्रॉईडApple Incअॅपल