Battlegrounds Mobile India ला मिळाला भारी अपडेट; गेमप्ले रेकॉर्ड करून करता येणार शेयर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:28 PM2021-09-18T12:28:25+5:302021-09-18T12:28:37+5:30

BGMI 1.6 update: नवीन Battlegrounds Mobile India 1.6 अपडेटमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय देण्यात आला आहे.  आता प्लेयर्स आपला गेमप्ले रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेयर करू शकतात.  

Battlegrounds mobile india update 1 6 released brings recording feature to android ios   | Battlegrounds Mobile India ला मिळाला भारी अपडेट; गेमप्ले रेकॉर्ड करून करता येणार शेयर 

Battlegrounds Mobile India ला मिळाला भारी अपडेट; गेमप्ले रेकॉर्ड करून करता येणार शेयर 

Next

Battlegrounds Mobile India गेम डेव्हलपर क्राफ्टनने अपडेट व्हर्जन 1.6 रिलीज केला आहे. या अपडेटच्या माध्यमातून अनेक नवीन मोड आणि फीचर्स प्लेयर्सना मिळणार आहेत. यात नवीन 'Flora Menace' मोड, नवीन Vs AI मोड आणि झॉम्बी मोड ‘Survival Till Dawn’ चा समावेश आहे. हा अपडेट Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर रोल आउट केला जात आहे.  

BGMI 1.6 अपडेट प्ले स्टोर किंवा अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध होण्यास वेळ लागू शकतो. अपडेट करणाऱ्या प्लेयर्सना इव्हेंट सेंटरमध्ये दोन क्लासिक क्रेट कुपन मिळतील. BGMI v1.6 अपडेटमधील नवीन 'Flora Menace' मोड 17 सप्टेंबरला Erangel च्या लॉबीत, 18 सप्टेंबरला सॅनहॉकमध्ये आणि 22 सप्टेंबरला लिविकमध्ये दिसेल. फ्लोरा मेनस मोड मॅप्स मिळवण्यासाठी प्लेयर्सना गेम सुरु करण्याआधी ‘मोड’ चेकबॉक्स टिक करावा लागेल.  

गेममध्ये नवीन Vs AI मोड देण्यात आला आहे. तसेच EvoGround मध्ये झॉम्बी मोड आणि पेलोड मोडचे पुनरागमन झाले आहे. आगामी काळात गेममध्ये आठ वेगवेगळे गेम मोड देण्यात येतील. नव्या अपडेटमध्ये एक ‘ऑटो-बॅंडेज’ पर्याय देखील देण्यात आला आहे. 

या अपडेटमधील महत्वाचा भाग म्हणजे नवीन बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया 1.6 अपडेटमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय दिला जात आहे. या मोडचा वापर करून प्लेयर्स आपला गेमप्ले रेकॉर्ड करू शकतील. रेकॉर्डेड क्लिप सोशल मीडियावर शेयर देखील करता येईल.  

Web Title: Battlegrounds mobile india update 1 6 released brings recording feature to android ios  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.